जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 10:21 PM2018-11-12T22:21:20+5:302018-11-12T22:21:47+5:30

अपूऱ्या पावसामुळे जिल्ह्यात दुष्काळ निर्माण झाला आहे. हजारो हेक्टरवरील धान पीक नष्ट झाले आहे. त्यानंतरही शासनाने दुष्काळग्रस्तांच्या यादीतून भंडारा जिल्ह्याचे नाव वगळले आहे. संपूर्ण भंडारा जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा.

Declare the district drought affected | जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा

जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा

Next
ठळक मुद्देशिवसेनेचे निवेदन : महिला रुग्णालयाचे बांधकाम करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : अपूऱ्या पावसामुळे जिल्ह्यात दुष्काळ निर्माण झाला आहे. हजारो हेक्टरवरील धान पीक नष्ट झाले आहे. त्यानंतरही शासनाने दुष्काळग्रस्तांच्या यादीतून भंडारा जिल्ह्याचे नाव वगळले आहे. संपूर्ण भंडारा जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा. तसेच जिल्हा महिला रुग्णालयाचे बांधकाम तातडीने सुरु करण्याची मागणी शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली.
शिवसेना जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या नेतृत्वात सोमवारी प्रशासनाला निवेदन देण्यात आले. भंडारा जिल्ह्यात यंदा अपूºया व पावसाने दुष्काळ निर्माण झाला आहे. धान पीकाचे उत्पादन घटले आहे. आधारभूत धान खरेदी केंद्रावर आवक घटली आहे. असे असतांनाही शासनाने घोषित केलेल्या दुष्काळाच्या यादीत भंडारा जिल्ह्यातील एकाही तालुक्याचा समावेश नाही, त्यामुळे शेतकरी दुष्काळग्रस्तांना मिळणाºया लाभापासून वंचित राहणार आहेत. यासाठी शासनाने तात्काळ संपूर्ण भंडारा जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा अशी मागणी करण्यात आली.
भंडारा येथे स्वतंत्र जिल्हा महिला रुग्णालय मंजूर झाले आहे. त्यासाठी आवश्यक तो निधी शासनाने मंजूर केला आहे. दोन वर्षांपुर्वी शासनाने २५ लाख रुपये टोकन निधी उपलब्ध करुन दिला. पंरतू अनेक महिने लोटूनही बांधकाम विभागाने रुग्णालय बांधकामाचे अंदाजपत्रक तयार केले नाही. महिला रुग्णालयाकरिता राज्य शासन सकारात्मक आहेत. त्यानंतर चार कोटी २६ लाख रुपये उपलब्ध करुन देण्यात आले. एकंदरीत रुग्णालयाकरिता चार कोटी ५० लाख रुपयांचा निधी उपलब्ध असूनही पुढील कारवाई थंडबस्त्यात आहे. याप्रकरणी योग्य निर्देश देण्याची सुचना निवेदनातून करण्यात आली.
या निवेदनावर शिवसेनेचे संजय रेहपाडे, लवकुश निर्वाण, प्रकाश मेश्राम, नरेश बावनकर, नितीन सेलोकर, नितीन पडोळे, नितेश वाडीभस्मे, मिलिंद खवास, नितेश पाटील, मनोहर जांगळे, जयंत परतेकी, दामोदर इटनकर, सुधीर लेंडे, मनोज जागळे, नरेश कारेमोरे, किशोन चन्ने, उपेंद्र बनकर, धनराज लांडे, सुरेश धुर्वे, राजेश बुराडे, किशोर यादव, देवानंद उके आदींच्या स्वाक्षºया आहेत.
याप्रकरणात शासनाने सकारात्मक निर्णय घेतला नाही तर आंदोलनाचा इशाराही या निवेदनातून देण्यात आला आहे. आता शासन काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Declare the district drought affected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.