साकोली तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2017 12:10 AM2017-08-27T00:10:47+5:302017-08-27T00:11:04+5:30

यावर्षी अत्यल्प पाऊस आला. त्यामुळे शेतकºयावर आर्थिक संकट कोसळले आहे. परिणामी शेतकºयांना उपजिवीका कशी करावी असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Declare Sakoli taluka as drought | साकोली तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा

साकोली तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा

Next
ठळक मुद्देहेमकृष्ण वाडीभस्मे यांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली : यावर्षी अत्यल्प पाऊस आला. त्यामुळे शेतकºयावर आर्थिक संकट कोसळले आहे. परिणामी शेतकºयांना उपजिवीका कशी करावी असा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतकºयावरील कर्जाचा डोंगर वाढतच आहे. त्यामुळे शासने साकोली तालुका दुष्काळग्रस्त घोषीत करुन सर्वांना सरसकट कर्जमाफी द्यावी अशी मागणी युवक राष्टÑवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष हेमकृष्ण वाडीभस्मे यांनी केली आहे.
यावर्षी साकोली तालुक्यात अत्यल्प पाऊस पडला. त्यामुळे ज्यांच्याजवळ सिचंनाची सोय नाही अशा शेतकºयांची रोवनीच झाली नाही. मात्र या शेतकºयांनी कर्ज काढुन हंगामापूर्वी शेतीची संपूर्ण कामे करुन पेरणी पूर्ण केली यात त्यांना हजारो रुपयांचा खर्च आला.
मात्र पावसाअभावी ते रोवणी पूर्ण करु शकली नाही. परिणामे धानाचे पºहे तसेच शेतात वाळले आहेत. तर ज्या शेतकºयांचे रोवणी पूर्ण झाली त्यांना भारनियमनाचा फटका बसत आहे. त्यामुळे साकोली तालुका दुष्काळग्रस्त घोषीत करुन सरसकट कर्जमाफीची मागणी वाडीभस्मे यांनी केली आहे.

जिल्हा दुष्काळग्रस्त केव्हा घोषित करणार?
भंडारा : अत्यल्प पावसामुळे अस्मानी संकटाचे गंभीर ढग स्पष्ट दिसून लागले असून भीषण दुष्काळाची परिस्थिती आहे. अपुºया पावसामुळे रोवणी खोळंबली हजारो एकर शेती रोवणीअभावी पडीत आहे. पºयांचा कालावधी अडीच महिन्यांपर्यंत पोहचला आहे. पावसाने दडी मारल्याने पºहे वाळली, रोवणी केलेल्या शेतीला मोठ मोठ्या भेगा पडल्या आहेत. तसेच अपुºया विद्युतमुळे सिंचनाच्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य निलकंठ कायते, प्रेम वनवे यांनी केली आहे. लघु सिंचन प्रकल्पात पाण्याचा पाहिजे तसा साठा अजुनही जमा नाही. जलयुक्त शिवार योजनेतून सिंचनक्षम करण्यात आलेल्या मामा तलावात पाण्याचा ठणठणाट आहे. अत्यल्प पावसामुळे सिंचनाची अपेक्षा या तलावांकडून करणे धाडसाचे ठरणारे आहे. रोहयो व जलयुक्त तलावातून तयार करण्यात आलेले शेततळे, बोळ्या व नाले कोरडे पडले आहेत. काही शेतकºयांनी रोवणीसाठी जलयुक्त शिवार योजनांतील उपलब्ध पाण्याचा वापर केल्याने आता ती कोरडी पडली आहेत. त्यामुळे शेतकरी पुरता हतबल असून शासन प्रशासनाने यावर वेळीच उपाय योजना करण्याची मागणी प्रेम वनवे, निलकंठ कायते यांनी केली आहे.
 

Web Title: Declare Sakoli taluka as drought

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.