निसर्गाच्या वक्रदृष्टीने धान उत्पादनात घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 05:32 AM2021-01-13T05:32:18+5:302021-01-13T05:32:18+5:30

भंडारा : यावर्षीच्या खरिपात पूर, किडींचा प्रादुर्भाव व परतीच्या पावसाने झालेल्या पिकांच्या नासाडीमुळे धान उत्पादनात कमालीची घट ...

Decreased grain production due to nature's curvature | निसर्गाच्या वक्रदृष्टीने धान उत्पादनात घट

निसर्गाच्या वक्रदृष्टीने धान उत्पादनात घट

Next

भंडारा : यावर्षीच्या खरिपात पूर, किडींचा प्रादुर्भाव व परतीच्या पावसाने झालेल्या पिकांच्या नासाडीमुळे धान उत्पादनात कमालीची घट आली आहे. त्यानंतर पिकाला कवडीमोल भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था 'तोंड दाबून बुक्क्यांचा मार' यासारखी झाली असून शेतकरी हा मजुरापेक्षाही दु:खी असल्याचे बोलले जात आहे. .

भंडारा जिल्ह्याची ओळख ही उद्योगविरहित, सिंचनाच्या सोयींचा अभाव, रबी मालासाठी उपलब्ध नसलेल्या बाजारपेठेचा जिल्हा म्हणून आहे. मुख्य पीक खरीप असल्याने जवळपास ९० टक्के लोक शेतीवर अवलंबून आहेत. शेती म्हणजेच सर्वस्व असल्याने येथील शेतकऱ्यांचे संसाराचे गाळे हे येणाऱ्या पिकावरच अवलंबून असते. अशातही अत्यल्प व कवडीमोल भाव यामुळे सर्व स्वप्नांना तिलांजली दिल्याशिवाय गत्यंतर नाही. इतकेच नाही तर शासनस्तरावरून विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी नाहक कागदपत्रे व कार्यालयांच्या चकरा माराव्या लागत असल्याने सामान्यांचा जीव मेटाकुटीस आलेला आहे.

जिल्ह्यात असलेल्या खरेदी केंद्रावर धानाची आवक वाढलेली असली तरीही शेतकऱ्यांना चुकाऱ्यांसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे शेतकरी पडक्या दरात धानाची विक्री करीत आहे. अडत्याकडे धानांच्या भावांचे बोर्डसुध्दा नाहीत.

त्यामुळे अडत्याने जो भाव सांगितला, त्याच भावात आपला माल विकल्याशिवाय गत्यंतर नसल्याने शेतकरी वर्ग अधिकच खचत असून जीवनाचा अंत स्वीकारण्यास धजावत असल्याचे चित्र दिसून येत आहे. म्हणूनच पाच एकर शेती असलेला शेतकरी हा मजुरापेक्षाही दु:खी आहे. तेव्हा 'बळी' न पडता बळीचे राज्य येण्यासाठी शासनाने कंबर कसून अभय देण्याची गरज आहे.

यावर्षी ऐन धान पीक कापणी योग्य असताना विविध रोगांच्या प्रादुर्भावामुळे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घट आली आहे. एकरी केवळ आठ ते दहा पोती उत्पादन होत असल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. तर काही शेतकऱ्यांनी धान पिकावर मावा, तुडतुडा रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने धानाची कापणी न करता तसेच ठेवल्याचे चित्र जिल्ह्यात पहावयास मिळत आहेत.

याकडे सरकारने शेतकऱ्यांची शेती कसण्याची हिंमत असणार नाही. त्यांच्यामध्ये नवी उमेद निर्माण व्हावी, यासाठी कसून लक्ष घालण्याची व बीपीएल, एपीएल असे भेदभाव न करता शेतीसाठी पूरक व्यवसाय निर्माण करुन शेतकऱ्यांना सन्मानाने जीवन जगता यावे, त्यांची हिंमत, सन्मान ढासळणार नाही.

धान खरेदी केंद्रावर धानाची मोजणी विलंबाने होत आहे. आपला नंबर कधी येणार अशी चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.

Web Title: Decreased grain production due to nature's curvature

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.