राजशिष्टाचारात अडकले वाचनालयाचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:39 AM2021-09-22T04:39:15+5:302021-09-22T04:39:15+5:30

नागरी सुविधा अंतर्गत काही महिन्यांपूर्वी लाखांदूर येथील शिवाजी टी पॉईंट चौकात नगर पंचायती अंतर्गत सार्वजनिक वाचनालयाचे बांधकाम करण्यात आले. ...

Dedication of the library stuck in courtesy | राजशिष्टाचारात अडकले वाचनालयाचे लोकार्पण

राजशिष्टाचारात अडकले वाचनालयाचे लोकार्पण

Next

नागरी सुविधा अंतर्गत काही महिन्यांपूर्वी लाखांदूर येथील शिवाजी टी पॉईंट चौकात नगर पंचायती अंतर्गत सार्वजनिक वाचनालयाचे बांधकाम करण्यात आले. बांधकाम पूर्ण झाल्याने १३ सप्टेंबर रोजी तालुका राष्ट्रवादीने वाचनालयाच्या लोकार्पणाची मागणी केली होती. या मागणीला उत्तर देताना मुख्याधिकारी डॉ. सौरभ कावळे यांनी येत्या सात दिवसांत वाचनालयाचे लोकार्पण करण्याची ग्वाही दिली होती. येथील नगरपंचायतीने २१ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता लोकार्पण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मात्र लोकार्पण कार्यक्रमाच्या निमंत्रणपत्रिकेत लाखांदूर येथील तहसीलदारांचे नाव बाद करण्यात आले होते. त्यामुळे तालुक्यातील सर्वच राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांनी तीव्र संताप व्यक्त केला. याप्रकरणी तालुक्यातील काही संघटनांनी सोशल मीडियावरून राजशिष्टाचाराचे उल्लंघन झाल्याचा आरोप केला आहे. नागरपंचायतीच्या वाचनालयाचे मंगळवार २१ सप्टेंबर रोजी लोकार्पण केले जाणार होते. या कार्यक्रमासाठी पत्रिकाही छापण्यात आल्या. या प्रकरणी कारवाईच्या भीतीने धास्तावलेल्या मुख्याधिकाऱ्यांनी तडकाफडकी वाचनालयाचा लोकार्पण सोहळाच रद्द केला आहे.

मुख्याधिकऱ्यांवर कारवाईची मागणी

गत काही वर्षांपासून राजकीय प्रभावात येथील मुख्याधिकारी प्रशासकीय व अन्य विकासकामे करीत असल्याचा आरोप होत आहे. त्यांच्या कारभाराचा फटका शहराच्या विकासाला बसत आहे. मनमानी पद्धतीने कोणतेही निर्णय घेतले जात असल्याचा आरोप आहे. आता राजशिष्टाचाराचे उल्लंघन केल्याप्रकरणी मुख्याधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी आहे.

210921\img20210921135605.jpg

वाचनालयाची नविन ईमारत

Web Title: Dedication of the library stuck in courtesy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.