वट पौर्णिमेनिमित्त वटवृक्ष ओट्याचे लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:25 AM2021-06-25T04:25:13+5:302021-06-25T04:25:13+5:30
करडी (पालोरा) : मुंढरी बुज येथे वट पौर्णिमेनिमित्त राजेंद्र शेडे मित्र परिवारातर्फे वर्गणीतून तयार करण्यात आलेल्या वट वृक्ष ओट्याचे ...
करडी (पालोरा) : मुंढरी बुज येथे वट पौर्णिमेनिमित्त राजेंद्र शेडे मित्र परिवारातर्फे वर्गणीतून तयार करण्यात आलेल्या वट वृक्ष ओट्याचे लोकार्पण करण्यात आले. ओट्यावर पूजनासाठी आलेल्या महिलांना उपवासाचा फराळ व महाप्रसादाचे वितरण गांधी चौकात करण्यात आले. मुंढरी बुज येथील बाजार चौकात वट वृक्षाचे १०० वर्षे जुने झाड आहे. येथील वृक्षाची परंपरेनुसार गावातील महिला पूजा करतात. मध्यंतरी त्या झाडाच्या सभोवती असलेला ओटा जीर्ण होऊन तुटल्याने महिलांसाठी तो गैरसोयीचा ठरत होता. या ओट्याच्या बांधकामासाठी राजेंद्र शेंडे व त्यांच्या मित्र परिवाराने ग्रामपंचायतीकडे वारंवार मागणी रेटून धरली. ग्रामपंचायत सदस्यांनीसुध्दा पुढाकार घेतला होता. महिलांचा महत्त्वाचा सण वट पौर्णिमा जवळ असताना राजेंद्र शेंडे मित्र परिवाराने वर्गणी काढून नवनिर्माणाचे काम हाती घेतले. वट पौर्णिमेच्या दिवशी बांधकामाचे लोकार्पण केले. कार्यक्रमासाठी भाजपा कार्यकर्ता राजेंद्र शेंडे, भगवान चांदेवार, ग्रामपंचायत सदस्य पंकज निमजे, मंगला लाडसे, प्रभाकांता नान्हे, गायत्री फुलसुंगे, गौरी गोमासे, नाना शेंडे, दिलीप लाडसे, गंगाधर शेंडे, सुरेश फुलसुंगे, प्रमोद ठवकर, विकास नशिने, राजू सोनवाने, रामेश्वर तुमसरे, बंडूजी लाडसे, बलवंत शेंडे, बंडू सोनवाने, माजी पोलीसपाटील वासुदेव गोमासे, सहसराम शेंडे, रवी मेश्राम, उमेश भोंगाडे व महिलांनी सहकार्य केले.