भंडारा जिल्ह्यात कालव्यात पडलेल्या सांबराला जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2018 11:23 AM2018-12-08T11:23:46+5:302018-12-08T11:26:05+5:30

गोसीखुर्द धरणाच्या उजव्या कालव्यात वन्यप्राणी पडणे ही आता नित्याचीच बाब झाली आहे, अशाच प्रकारची घटना गुरुवारला सकाळच्या सुमारास संरक्षीत वन कोरंभी बिट कक्ष क्र. २१६ङ्कमधून जाणाऱ्या कालव्यात घडली.

Deer fallen in canal, remain safe in Bhandara district | भंडारा जिल्ह्यात कालव्यात पडलेल्या सांबराला जीवदान

भंडारा जिल्ह्यात कालव्यात पडलेल्या सांबराला जीवदान

Next
ठळक मुद्देकोरंभीतील घटना मैत्र वन्यजीव संरक्षण व संवर्धन संस्थेचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा: गोसीखुर्द धरणाच्या उजव्या कालव्यात वन्यप्राणी पडणे ही आता नित्याचीच बाब झाली आहे, अशाच प्रकारची घटना गुरुवारला सकाळच्या सुमारास संरक्षीत वन कोरंभी बिट कक्ष क्र. २१६ मधून जाणाऱ्या कालव्यात घडली. कालव्यात सांबर पडल्याची माहिती मिळताच मैत्र वन्यजीव संरक्षण व संवर्धन बहुउद्दशीय संस्था पवनी व वनविभागाच्या बचाव दलाच्या संयुक्त प्रयत्नाने नहरात पडलेल्या सांबराला सुखरुप बाहेर काढण्यात आले.
कालव्यात सांबर पडल्याची मिळताच वन विभागाने नहरात सांबर पडले असल्याची खातरजमा करुन मैत्रच्या पदाधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलविण्यात आले. कालव्यात पडलेला सांबर हा थकून उपकालव्याच्या प्रवेशव्दाराला बसून असल्यामुळे त्याला पकडण्यात आले. सांबराला उचलून पडल्या जागेवरुनच वरती उचलण्याची कसरत करावी लागली. बचाव कार्यात महादेव शिवरकर, संघरत्न धारगांवे, माधव वैद्य, चंद्रकांत काटेखाये, अमोल वाघधरे, गजानन जुमळे प्रभारी क्षेत्रसहायक ए.एस.करपते, बिटरक्षक ए. व्ही. खेंते, एच. ए. जायभाये, पी. बी. मुंडे, ओ.ए.बावनथडे, आर. ए. कुर्झेकर, वनमजूर टी.के. डाहारे, पचारे, अशोक बोरकर, विपीन तलमले यांचा समावेश होता.

Web Title: Deer fallen in canal, remain safe in Bhandara district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.