हरीण आढळले मृत अवस्थेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 06:17 PM2019-05-19T18:17:04+5:302019-05-19T18:17:09+5:30
कजगाव ता.भडगाव : येथील कजगाव- गोंडगाव रोड लगत असलेल्या शेतात एक हरीण मृत अवस्थेत आढळले. याबाबत वन अधिकारी यांना ...
कजगाव ता.भडगाव : येथील कजगाव- गोंडगाव रोड लगत असलेल्या शेतात एक हरीण मृत अवस्थेत आढळले. याबाबत वन अधिकारी यांना खबर दिल्यावरून त्या हरणास वन खात्याच्या कर्मचाऱ्यांनी तेथेच खड्डा करुन दफन केले. तर या हरणाचा मृत्यू हा पाण्याअभावी झाला असावा, अशी शंका लोकांमध्ये व्यक्त होत आहे.
याबाबत वृत्त की, कजगाव -गोंडगाव रोड लगत असलेल्या वसंत वामन शिनकर यांच्या कजगाव शिवारातील शेतात १९ रोजी सकाळी दहा वाजता एक हरीण मृत अवस्थेत पडलेले दिसल्याने त्यांनी वनविभागास लगेचच कळविले. वन खात्याच्या कर्मचाऱ्यांनी मृत हरण ताब्यात घेत त्यास तेथेच दफन केले. याबाबत वन कर्मचाºयांना विचारणा केली असता सदर हरणाचा मृत्यू तीन ते चार दिवसांपूर्वी कुत्र्यानी चावल्यामुळे झाला असल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला. हे हरीण अंदाजे एक वर्ष वयाचे असावे, असेही त्यांनी सांगितले.
अनेक हरणाचे कळप
कजगाव- गोंडगाव मार्गावर बरड व टेकड्या मोठ्या प्रमाणात आहेत. अशा या ओस शिवारात हरीणाचे अनेक कळप आहेत. या परिसरातील शेतकºयांना ते दररोज नजरेस पडतात.
पाणवठे नाहीत
वन विभागाने या भागात कुत्रीम पाणवठे तयार करणे गरजेचे होते मात्र या बाबीकडे सातत्याने दुर्लक्ष झाले आहे. पाण्याअभावीच हरणाचा मृत्यु झाला अशी याभागात चर्चा आहे. आता तरी वनविभागाने या भागात कुत्रिम पाणवठे बनवावेत अशी मागणी होत आहे.