अज्ञात वाहनाच्या धडकेत हरिणी ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:55 AM2021-01-08T05:55:19+5:302021-01-08T05:55:19+5:30
तुमसर : भरधाव अज्ञात वाहनाच्या धडकेत हरिणी जागीच ठार झाल्याची घटना भंडारा- तुमसर राज्य मार्गावरील खरबी-खापा गावादरम्यान रविवारी सायंकाळी ...
तुमसर : भरधाव अज्ञात वाहनाच्या धडकेत हरिणी जागीच ठार झाल्याची घटना भंडारा- तुमसर राज्य मार्गावरील खरबी-खापा गावादरम्यान रविवारी सायंकाळी घडली. ही हरिणी तीन वर्षे वयाची हाेती. अलीकडे जिल्ह्यात वाहनाच्या धडकेत वन्यप्राण्यांचा बळी जाण्याची ही तिसरी घटना हाेय.
चाऱ्याच्या शाेधात राज्यमार्ग ओलांडताना अज्ञात वाहनाने हरिणीला धडक दिली. त्यात तिचा चेंदामेंदा हाेऊन ती जागीच ठार झाली. घटनेची माहिती हाेताच वनविभागाची चमू घटनास्थळी दाखल झाली. तुमसर वनपरिक्षेत्र अधिकारी जी. एफ. लुचे, वनरक्षक मस्के, वाहनचालक गाेलू लांजेवार, यांनी घटनेचा पंचनामा केला. तीन वर्षीय हरिणीचे शवविच्छेदन करून येरली जंगलात अंत्यसंस्कार करण्यात आले. भटक्या व हिंस्त्र प्राण्यांपासून हरिणीच्या मृतदेहाला धाेका हाेऊ नये म्हणून शुभम गभणे, हर्षल बडवाईक, अभिषेक देशमुख, राेशन बडवाईक, साेनू देशमुख हे हरिणीला रस्त्यावरून बाजूला करून घटनास्थळावर अधिकारी येईपर्यंत तळ ठाेकून हाेते.
बाॅक्स
तिसरी घटना
गत आठवड्यात तुमसर तालुक्यात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट तर लाखांदूर तालुक्यात चितळाचा मृत्यू झाला हाेता. चाऱ्याच्या शाेधात जनावरे राज्यमार्ग ओलांडतात. त्यावेळी भरधाव वाहनाची धडक बसते. वाहनचालकांनी वेगमर्यादेचे पालन करणे आवश्यक आहे.