पराभव माणसाला स्पर्धेत कायम जिवंत ठेवते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 08:43 AM2021-02-05T08:43:19+5:302021-02-05T08:43:19+5:30

सुभाष वाॅर्ड वरठी येथे आयोजित क्रिकेट स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात ते बोलत होते. येथील हौशी युवकांनी कोविड १९ च्या ...

Defeat keeps a man alive in competition | पराभव माणसाला स्पर्धेत कायम जिवंत ठेवते

पराभव माणसाला स्पर्धेत कायम जिवंत ठेवते

Next

सुभाष वाॅर्ड वरठी येथे आयोजित क्रिकेट स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात ते बोलत होते. येथील हौशी युवकांनी कोविड १९ च्या दरम्यान मृत झालेल्या नागरिकांच्या स्मृतिप्रीत्यर्थ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते. बक्षीस वितरणाच्या अध्यक्षस्थानी बेटाळाचे सरपंच रामसिंग बैस, तर प्रमुख पाहुणे म्हणून स्पर्धेचे मार्गदर्शक व माजी सरपंच संजय मिरासे, उपसरपंच सुमित पाटील, रितेश वासनिक, अरविंद येळणे, ग्रामपंचायत सदस्य अतुल भोवते, योगेश हटवार, बाबा बडवाईक, नवीन पशिने, रेवा गायधने, नितीन काकडे, सुनील बन्सोड, पवन रामटेके, मिलिंद धारगावे, प्रकाश मिश्रा, प्रकाश बोन्द्रे, दीपक मदान, कैलास तितिरमारे उपस्थित होते.

स्पर्धेत जवळपास ४० चमूंनी सहभाग घेतला होता. ४१ हजारांचे प्रथम पारितोषिक वरठी येथील जीआरसी क्लब, २० हजारांचे द्वितीय बक्षीस व्हीएससीसी व तृतीय बक्षीस कोयला खदान क्रिकेट क्लब यांनी पटकाविला. मॅन ऑफ दि सिरीज व बेस्ट बॅट्समन पुरस्कार रणजी क्रिकेट खेळाडू उर्वेश पटेल यांना देण्यात आले.

स्पर्धेत उत्कृष्ट पंच म्हणून प्रदीप वंजारी, रमेश तितीरमारे, तुषार लोणारे, ऋषील पारधी, सचिन झळके, प्रीतम मेश्राम, तेजस काकडे व सूर्यकांत झळके व समालोचक विक्की भिवगडे, कार्तिक गुप्ता, योगेश बुधे, पवन ऑइम्बे व मुन्ना लोणारे यांना मंडळाकडून सन्मानित करण्यात आले.

संचालन तथागत मेश्राम व प्रास्ताविक आणि आभार संजय मिरासे यांनी मानले. कार्यक्रमास चंद्रशेखर झळके, आदित्य मते, शशिकांत भुजाडे, अमोल बन्सोड, चिन्मय दत्तात्रये, सचिन झळके, विनोद सरोदे, नितीन चकोले, रिंकू भाजीपाले, कुणाल लोणारे व निर्मल मदान उपस्थित होते.

Web Title: Defeat keeps a man alive in competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.