पवनारखारीत राष्ट्रध्वजाचा अवमान
By admin | Published: January 28, 2017 12:39 AM2017-01-28T00:39:43+5:302017-01-28T00:39:43+5:30
प्रजासत्ताकदिनी ध्वजारोहण करताना राष्ट्रीय ध्वज खाली पडला. यामुळे उपस्थितांमध्ये खळबळ उडाली.
तुमसर : प्रजासत्ताकदिनी ध्वजारोहण करताना राष्ट्रीय ध्वज खाली पडला. यामुळे उपस्थितांमध्ये खळबळ उडाली. हा प्रकार पवनारखारी ग्रामपंचायतीत घडला. पोलीस पाटलांच्या तक्रारीवरून सरपंचावर गोबरवाही पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
प्रजासत्ताक दिनी पवनारखारी ग्रामपंचायतीत ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. ध्वजारोहनाला गावातील मान्यवर उपस्थित होते. सरपंच कविता बोमचोर यांचे हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम घेण्याचे ठरले होते. राष्ट्रीय तिरंगा ध्वज व जातांनी हातातून दोरी सुटल्याने क्षणात तिरंगा ध्वज खाली पडला. पोलीस पाटील राजेश गोयनका यांनी संबंधित तक्रार गोबरवाही पोलीस ठाण्यात दिली. गोबरवाही पोलिसांनी सरपंच कविता बोमचेर यांच्या विरोधात राष्ट्रध्वज अवमान कलम १९७१/२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी माजी सरपंच व विद्यमान सदस्य विलास उचिबगले, दिलीप उईके, रेणूका परबते, संगीता कुंभरे, आशिष कोकुडे यांनी संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे. राष्ट्रध्वज फडकविण्याची तयारी संबंधित ग्रामपंचायतीचे ग्रामसेवकावर कर्मचारी या नात्याने होती. येथे सरपंचा बरोबर संबंधित शासकीय कर्मचाऱ्यांविरोधातही कारवाई करण्याची गरज आहे. (तालुका प्रतिनिधी)
ध्वजारोहण झालेच नाही
तुमसर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलाच्या वसतीगृहात प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण झाले नाही. स्थानांतरीत झालेल्या पहिल्या वस्तीगृहात ध्वज व इतर साहित्य ठेवलेल्या खोलीस नगरपरिषद प्रशासनाने सील केले होते. नविन इमारतीत वसतीगृह स्थानांतरित झाले. नविन ध्वज व साहित्य पुरवठा करण्याचे पत्र जिल्हा स्तरावरील कार्यालयाला दिले होते. साहित्य उपलब्ध न झाल्याने ध्वजारोहण झाले नसल्याचे गृहपालांनी सांगितले.