रस्ता बांधकामात डेरेदार वृक्षांची कत्तल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:49 AM2021-02-26T04:49:20+5:302021-02-26T04:49:20+5:30

तुमसर : तुमसर देव्हाडी रस्ता बांधकामात डेरेदार वृक्षांची मोठ्या प्रमाणात कत्तल करण्यात आली होती. त्यानंतर थातूरमातूर वृक्षलागवड करण्यात ...

Deforestation in road construction | रस्ता बांधकामात डेरेदार वृक्षांची कत्तल

रस्ता बांधकामात डेरेदार वृक्षांची कत्तल

Next

तुमसर : तुमसर देव्हाडी रस्ता बांधकामात डेरेदार वृक्षांची मोठ्या प्रमाणात कत्तल करण्यात आली होती. त्यानंतर थातूरमातूर वृक्षलागवड करण्यात आली. परंतु वृक्ष संगोपनाकडे येथे दुर्लक्ष दिसत आहे. नियोजनाअभावी वृक्ष जिवंत राहण्याची शक्यता कमीच दिसत आहे. संबंधितांनी दहा वर्ष देखभाल, नियोजन करण्याचा नियम आहे.

तुमसर देव्हाडी या रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात आले. त्यापूर्वी रस्त्याच्या दोन्ही बाजूला ७० ते ८० वर्ष जुने डेरेदार वृक्ष होते. त्यांची संख्याही मोठी होती. परंतु रस्ता बांधकामात ती संपूर्ण झाडे कापण्यात आली. रस्ता बांधकाम पूर्ण झाले. पावसाळ्यात संबंधित कंत्राटदाराने रस्त्याच्या दोन्ही बाजूला वृक्ष लागवड केली. परंतु वृक्ष लागवड केल्यानंतर त्याचे संगोपन व देखरेख होताना येते दिसत नाही. वृक्ष लागवड केल्यानंतर ती झाडे दिसत नाही. रस्त्याच्या दोन्ही बाजूला नालींची कामे करण्यात आली. गवत मोठ्या प्रमाणात उगवले आहे.

रस्ता बांधकामात तोडण्यात आलेल्या झाडांच्या दुप्पट झाडे रस्त्याच्या दोन्ही बाजूला लावण्याचा नियम आहे. वृक्ष लागवडीनंतर सुमारे दहा वर्ष त्या झाडांचे संगोपन व देखरेख करण्याची जबाबदारी संबंधित कंत्राटदाराची असते. येथे रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावण्यात आली परंतु त्यांची देखरेख व संगोपन या ठिकाणी दिसत नाही. त्यामुळे झाडांची वाढ कशी होणार हा येथे प्रश्न आहे.

कोट

तुमसर देव्हाडी रस्त्याच्या दोन्ही बाजूला कंत्राटदाराने वृक्ष लागवड केली आहे. दहा वर्ष संबंधित कंत्राटदाराला या वृक्षांची देखभाल व नियोजन करण्याची जबाबदारी आहे.

विनोद चुरे, उपविभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग तुमसर

Web Title: Deforestation in road construction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.