डिग्री जलाओ आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2018 12:33 AM2018-03-02T00:33:47+5:302018-03-02T00:33:47+5:30

स्वतंत्र विदर्भाशिवाय वैदर्भियांचा विकास नाही, बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना नोकर भरती नाही, यामुळे विदर्भ राज्य आंदोलन समितीने होळीच्या पर्वावर गुरूवारला स्थानिक त्रिमूर्ती चौकात डिग्री जलावो आंदोलन केले.

Degree burn movement | डिग्री जलाओ आंदोलन

डिग्री जलाओ आंदोलन

Next
ठळक मुद्देविदर्भ राज्य आंदोलन समिती : होळीच्या पर्वावर केले आंदोलन

ऑनलाईन लोकमत
भंडारा : स्वतंत्र विदर्भाशिवाय वैदर्भियांचा विकास नाही, बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना नोकर भरती नाही, यामुळे विदर्भ राज्य आंदोलन समितीने होळीच्या पर्वावर गुरूवारला स्थानिक त्रिमूर्ती चौकात डिग्री जलावो आंदोलन केले.
स्वतंत्र विदर्भाची मागणी ही फार वषार्पासून सुरू आहे. परंतु राजकीय पदाधिकाºयांनी वैदर्भीय जनतेशी भावनिक खेळ करून स्वत:चे स्वार्थ साधले. सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी सत्तेत येण्यापूर्वी वेगळ्या विदर्भासाठी अनेक आंदोलने केली. त्यावेळी अनेक घोषणा दिल्या. बेरोजगारीपासून वंचितांना सत्तेत येताच विदर्भ वेगळा देऊ बेरोजगारांना रोजगार देऊ, शेतकºयांना विविध समस्यांपासून न्याय देऊ, असे आश्वासन दिले होते. परंतु सत्तेत येताच हे नेते विदर्भाची मागणी विसरले. आता हेच सत्तेत असलेले नेते विदर्भ सक्षम झाल्याशिवाय आम्ही विदर्भ वेगळा देणार नाही, असे सांगत आहेत. आम्हा शिक्षीत तरूणांना महाराष्ट्रात ठेऊन आमची फसवणूक करण्यात येत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने आक्रोश युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रविण भोंदे, युवा आघाडीचे तालुका अध्यक्ष भाऊ कातोरे, प्रणय घुले यांच्या नेतृत्वात डिग्री जलाओ आंदोलन करण्यात आले. यावेळी समितीचे जिल्हाध्यक्ष वासुदेवराव नेवारे, उपाध्यक्ष राजकपूर राऊत, कोर कमेटीचे सदस्य दामोधर क्षीरसागर, अभिजीत वंजारी, देवीदास लांजेवार, के.एन. नान्हे, अर्जुन सुर्यवंशी, प्रभु तईकर, जाधवराव साठवणे, रेणुका धकाते, प्रिया शहारे, सुलभा हटवार, सविता शहारे, सरीता राठोड, सोनिया डोंगरे, संतोष कातोरे, अमोल साठवने, राहुल ठवकर, कडव, तुषार कातोरे, चांगो निबार्ते, सुनिल कातोरे, पृथ्वीराज गोंडाणे, निखिल घुले, दीक्षित रामटेके, भूषण लांडगे, मुजिफ शेख, नुरज दुरूगकर, कैलास भोंदे, अतुल भोंदे, शुभम तरारे यांच्यासह स्वतंत्र विदर्भ राज्य आंदोलन समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Degree burn movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.