पराभवाच्या भीतीने राज्यात पोटनिवडणुकांना विलंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 09:52 PM2018-03-16T21:52:01+5:302018-03-16T21:52:01+5:30

लोकसभेच्या पोटनिवडणुकांमध्ये भाजपचा सातत्याने पराभव होत असल्यामुळे राज्यातील भंडारा आणि पालघर या दोन लोकसभा क्षेत्राच्या पोटनिवडणुका जाहीर करण्यात विलंब करण्यात येत आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी खासदार नाना पटोले यांनी केला आहे.

Delay in the state by the fear of defeat | पराभवाच्या भीतीने राज्यात पोटनिवडणुकांना विलंब

पराभवाच्या भीतीने राज्यात पोटनिवडणुकांना विलंब

googlenewsNext
ठळक मुद्देनाना पटोले : मुख्य निवडणूक आयुक्तांना निवेदन

आॅनलाईन लोकमत
भंडारा : लोकसभेच्या पोटनिवडणुकांमध्ये भाजपचा सातत्याने पराभव होत असल्यामुळे राज्यातील भंडारा आणि पालघर या दोन लोकसभा क्षेत्राच्या पोटनिवडणुका जाहीर करण्यात विलंब करण्यात येत आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी खासदार नाना पटोले यांनी केला आहे.
भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाच्या रिक्त जागेवर निवडणूक घेण्यासंदर्भात पटोले यांनी शुक्रवारला दिल्लीत मुख्य निवडणूक आयुक्तांना निवेदन दिले आहे. आपण खासदारपदाचा राजीनामा ७ डिसेंबरला दिला. त्यानंतर पालघरचे भाजपचे खासदार चिंतामण वनगा यांचे निधन झाले. तेव्हापासून या दोन्ही ठिकाणी खासदारपद रिक्त आहे. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांच्या लोकसभा सदस्यपदाचा राजीनामा व माझा राजीनामा १५ डिसेंबरला या एकाच दिवशी लोकसभा अध्यक्षांनी मंजूर केला.
उत्तरप्रदेशातील गोरखपूर व फुलपूर या दोन्ही मतदारसंघांची निवडणूक ११ मार्चला झाली. परंतु आपण राजीनामा देऊन तीन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी होऊनही पोटनिवडणूक घेण्यात आली नाही. उत्तरप्रदेशमध्ये मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातच भाजपचा पराभव झाला. पोटनिवडणुकासंदर्भात राज्य सरकारची भूमिका महत्त्वाची असते. लोकांमध्ये भाजपबद्दल नाराजी असल्यामुळे राज्यातही भाजपचा पराभव होऊ शकेल, या भीतीने मुख्यमंत्री पोटनिवडणुकीसाठी विलंब करीत आहेत, असा आरोप नाना पटोले यांनी केला आहे. भंडारा-गोंदिया मतदारसंघात राष्ट्रवादी निवडणूक लढवणार का? यावर ते म्हणाले, निवडणुका तर जाहीर होऊ द्या? निवडणूक कोण लढणार याची चिंता भाजपने करू नये, असा पलटवारही पटोले यांनी केला.

Web Title: Delay in the state by the fear of defeat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.