मागणी ४० लाख बारदान नगाची, मिळाले केवळ दहा लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:23 AM2021-06-30T04:23:19+5:302021-06-30T04:23:19+5:30

यावर ताेडगा काढण्यासाठी जिल्हा पणन कार्यालयाने संबंधितांकडे ४० लाख बारदान नगाची मागणी केली. मात्र जिल्ह्याला आतापर्यंत केवळ १० लाख ...

Demand for 40 lakh bags, only 10 lakh received | मागणी ४० लाख बारदान नगाची, मिळाले केवळ दहा लाख

मागणी ४० लाख बारदान नगाची, मिळाले केवळ दहा लाख

Next

यावर ताेडगा काढण्यासाठी जिल्हा पणन कार्यालयाने संबंधितांकडे ४० लाख बारदान नगाची मागणी केली. मात्र जिल्ह्याला आतापर्यंत केवळ १० लाख नग बारदान प्राप्त झाले आहे. अद्यापही धानखरेदी सुरू आहे. कृषी विभागाच्या अंदाजानुसार १४ लाख क्विंटल धानाचे उत्पन्न अपेक्षित आहे. ऐवढा धान साठविण्यासाठी माेठ्या प्रमाणात बारदान्याची गरज आहे. परंतु जिल्ह्याला केवळ १० लाख बारदान मिळाल्याने धानखरेदी प्रभावित झाली आहे. बारदाना नसल्याने अनेक केंद्रचालकांपुढे धानखरेदीचा प्रश्न निर्माण झाला आहे.

बाॅक्स

२० हजार शेतकऱ्यांनी विकला धान

रबी हंगामात जिल्ह्यातील २० हजार १५४ शेतकऱ्यांनी आधारभूत किंमतीनुसार धान विकला आहे. पणन महासंघाने ८ लाख ७७ हजार ४४५ क्विंटल धान खरेदी केला आहे. भंडारा तालुक्यात ५५ हजार २३६ क्विंटल, माेहाडी तालुक्यात १ लाख ५५ हजार ८२० क्विंटल, तुमसर तालुक्यात दोन लाख ४७ हजार ५४९, लाखनी तालुक्यात ६६ हजार ८६ क्विंटल, साकाेली तालुक्यात एक लाख १९ हजार ७७८ क्विंटल, लाखांदूर तालुक्यात एक लाख ३६ हजार ९३४ क्विंटल आणि पवनी तालुक्यात ७६ हजार ३९ असा आठ लाख ७७ हजार ४४५ क्विंटल धानखरेदी करण्यात आला आहे.

बाॅक्स

धानखरेदीचा आज शेवटचा दिवस

आधारभूत धानखरेदी करण्याचा ३० जून हा शेवटचा दिवस आहे. मात्र यंदा उशिराने खरेदी सुरू झाल्याने आधारभूत खरेदीला मुदतवाढ देण्याची मागणी शेतकरी करीत आहे. आतापर्यंत निम्माच धान खरेदी झाला आहे. त्यामुळे एक महिना मुदतवाढ देण्याची गरज आहे. मुदत वाढ मिळाली नाही तर शेतकऱ्यांना आपला धान व्यापाऱ्यांना विकावा लागेल. त्यात त्यांची आर्थिक पिळवणूक हाेणार आहे.

Web Title: Demand for 40 lakh bags, only 10 lakh received

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.