इसापूर-मचारणा रस्ता डांबरीकरणाची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:55 AM2021-01-08T05:55:14+5:302021-01-08T05:55:14+5:30
इसापूर येथील शेतकऱ्यांची शेतजमीन मचारणा या गावाकडे जाणाऱ्या रस्त्यालगत आहे. त्यामुळे इसापूर येथील शेतकरी बांधवांना दररोज शेतावर आवागमन करावे ...
इसापूर येथील शेतकऱ्यांची शेतजमीन मचारणा या गावाकडे जाणाऱ्या रस्त्यालगत आहे. त्यामुळे इसापूर येथील शेतकरी बांधवांना दररोज शेतावर आवागमन करावे लागते. अपघातांमध्ये वाढ होत असल्याचेही दिसून येत आहे.
पालांदूर येथील आठवडी बाजारात ये-जा करावी लागते, परंतु या रस्त्याचे अजूनपर्यंत डांबरीकरण करण्यात आले नाही. त्यामुळे शेतकरी, शेतमजूर, नागरिक व प्रवाशांना प्रवास करणे जिकिरीचे ठरत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याची तत्काळ दखल घेऊन इसापूर ते मचारणा रस्त्याचे डांबरीकरण करण्याची मागणी प्रकाश देशपांडे, एस. के. वैद्य, बाळकृष्ण शेंडे, हरिदास बोरकर, भागवत दामले, माधव बोरकर, वामन कांबळे, हर्षवर्धन हुमणे, संदीप बर्वे, बंडू फुलझेले, अंबादास नागदेवे, रक्षानंद नंदागवळी, दामोदर उके, मंगेश मेश्राम, मोरेश्वर लेधारे, जितेंद्र खोब्रागडे, उमाकांत काणेकर, नितीश काणेकर यांनी केली आहे.या मागणीची पूर्तता न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल.
या आंदोलनात होणाऱ्या नुकसानीची जवाबदारी शासन, प्रशासनाची राहील, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.