नाल्या स्वच्छ करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:34 AM2021-05-24T04:34:22+5:302021-05-24T04:34:22+5:30
कोंढा हे जवळपास ८ हजार लोकसंख्येचे आहे. तालुक्यात एक मोठे गाव म्हणून ओळ्खले जाते. या गावाला स्वच्छता मोहीम ...
कोंढा हे जवळपास ८ हजार लोकसंख्येचे आहे. तालुक्यात एक मोठे गाव म्हणून ओळ्खले जाते. या गावाला स्वच्छता मोहीम राबविण्यात आल्याबदल अनेकदा पुरस्कार मिळाला आहे. पण हे पुरस्कार फक्त नावापुरते म्हणावे लागेल, स्वच्छता मोहीम पाहण्यासाठी अधिकारी आले की स्वच्छता दाखविली जाते, नंतर जिकडे तिकडे घाण नालीत पहावयास मिळते. सध्या सर्व वॉर्डात नाली गाळ व कचरा याने भरले आहे. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे, डासांमुळे मलेरिया, डेंग्यू यासारखा रोगांचा धोका वाढू शकतो. गाळ काढणे हे पावसाळ्या पूर्वी सुरू करणे आवश्यक आहे. तसेच गावात डासांवर प्रतिबंधक फवारणी करणे आवश्यक आहे. यावर्षी लवकर पावसाळा सुरू होणार आहे ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी गाळ काढण्याची मोहीम राबविण्यात यावे, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.