भंडारा जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2019 01:22 AM2019-07-27T01:22:39+5:302019-07-27T01:23:29+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : भंडारा जिल्हा हा शेतकऱ्यांचा जिल्हा अंसून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धान पिकाचे उत्पादन घेण्यात येते. ...

Demand for declaration of Bhandara district drought affected | भंडारा जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्याची मागणी

भंडारा जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्याची मागणी

Next
ठळक मुद्देखरीप हंगामाला निर्सगाचा फटका : विविध पक्ष, संघटनांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : भंडारा जिल्हा हा शेतकऱ्यांचा जिल्हा अंसून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धान पिकाचे उत्पादन घेण्यात येते. परंतु यवर्षी पाऊस अत्यंत कमी प्रमाणात आल्यामुळे धानाचे पऱ्हे वाळलेले आहेत. दुबार पेरणीने शेतकऱ्यांचे पऱ्हे पुर्णत: जळलेले आहेत. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी भंडारा जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे.
शेतकऱ्यांना सरसकट ३० हजार रुपये हेक्टरी मदत करावी, शेतकऱ्यांना धान बियाणे मोफत देण्यात यावे, शेतकऱ्यांना शेतीकरीता १६ तास वीज पुरवठा करावा, रासायनिक खताचे दर कमी करावे, धानाला प्रति क्विंटल तीन हजार रुपये हमी भाव देण्यात यावे, सरकारने वाढविलेली पेट्रोल-डिझेलचे दरवाढ कमी करावे, भंडारा जिल्ह्यातील धान पिकासाठी सर्व प्रकल्पाचे पाणी सोडण्यात यावे. शेतकऱ्यांच्या मुलाचे शिक्षणाची व परिक्षा शुल्क माफ करण्यात यावी, शेतकऱ्यांना १० हजार रुपये महिना पेन्शन लागू करण्यात यावे, या मागण्या पुर्ण करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
शिष्टमंडळात जिल्हाध्यक्ष नाना पंचबुध्दे, प्रदेश सरचिटणीस धनंजय दलाल, यशवंत सोनकुसरे, उत्तम कळपते, तालुकाध्यक्ष नरेंद्र झंझाड, हितेश सेलोकर, सुभाष वाघमारे, महेश जगनाडे, प्रदिप सुखदेवे, उमेश ठाकरे, रामेश्वर राघोर्ते, निरंजन पाटील, प्रेमलाल तुमसरे, महेश निंबार्ते, सुभाष तितिरमारे, गिरीष ठवकर, नंदकिशोर गाढवे, ईस्तारी कहालकर, तुकाराम हातझाडे, यशवंत मडामे, पंकेश काळे, किशोर ठवकर, महेश भोंगाडे, गणेश चौधरी, राहुल निर्वाण, वामन शेंडे, वर्षा आंबाडारे, मंजूषा बुरडे, जुमाला बोरकर, हर्षा वैद्य, छाया गभणे, अज्ञान राघोर्ते, विक्रम उजवणे, मोहन डोरले, विजय खेडीकर, बंडू शेंडे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

आपत्ती व्यवस्थापन मदत जाहीर करा
लाखांदूर : भंडारा जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करून आपत्ती व्यवस्थापन मदत जाहीर करा, अशा आशयाचे निवेदन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टी व वंचित बहुजन आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने तहसिलदारामार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले. यावेळी लाखांदुर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष भुमेश्वर महावाडे, वंचित बहुजन आघाडी साकोली विधानसभा अध्यक्ष चंद्रशेखर टेंभुर्णे, सतीश टेंभुर्णे, आसाराम कुकसे, देविदास केझरकर, निशाद लांजेवार, जयगोपाल लांडगे, ऊत्तम भागडकर, दिपक बगमारे, नितेश पिलारे, कोमल दाणी, शुभम प्रधान, सौ शुद्धमता नंदागवळी, संतोष राऊत, प्रकाश देशमुख, मुखरू दुपारे उपस्थीत होते.
यावर्षी पडलेल्या पावसाचे प्रमाण अत्यल्प असून खरीप पिकाची धानरोवणी ३.८७ टक्के झाली आहे. उर्वरित क्षेत्रावरील रोपे पावसाअभावी वाळण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. कोरडवाहु क्षेत्रावरील रोवणी पुर्ण होणे अशक्य व त्यासोबतच सिंचन क्षेत्रावरील रोवणी विद्युत भरनियमनामुळे होऊ शकत नाही.
विद्युत भरनियमन कमी करून २४ तास विद्युत पुरवठा करण्यात यावा, कृषी सन्मान योजनेअंतर्गत सहा हजार रुपये त्वरीत अदा करावी, छत्रपती शिवाजी महाराज कर्ज माफी योजनेअंतर्गत कर्ज राशी माफ करण्यात यावी, कर्ज माफ करण्यात आलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा कर्ज देण्यात यावे, गोसे धरणाचे व इटियाडोहचे पाणी सोडण्यात यावे, अन्यथा आंदोलनाचा इशारा निवेदनातून दिला आहे.

Web Title: Demand for declaration of Bhandara district drought affected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.