महामार्गावरील नाली बांधकाम दोन्ही बाजूला सारखेच करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:34 AM2021-03-20T04:34:44+5:302021-03-20T04:34:44+5:30
इतर महामार्गावर गावात नाली बांधकाम जमीन लेव्हलपासून होत असताना कोंढा कोसरा येथे कोसरा बाजूने ५ फूट उंच काम केले ...
इतर महामार्गावर गावात नाली बांधकाम जमीन लेव्हलपासून होत असताना कोंढा कोसरा येथे कोसरा बाजूने ५ फूट उंच काम केले जाते असल्याने हे काम अन्याय करणारे आहे. त्यामुळे अनेक लोकांचा धंदा बंद पडणार असल्याची भीती व्यक्त होत आहे.
बॉक्स
आधी जागेचा मोबदला द्या
नाली बांधकाम करतांना दोन्ही बाजूंनी सारखीच लेव्हल घेण्यात यावी, तसेच ज्या जमीन मालक, दुकानदारांची जमीन महामार्ग कामासाठी मागितली जात आहे. त्याआधी त्या जमिनीचे जिल्हाधिकारी कार्यालय, भंडारा तर्फे जमीन अधिग्रहण करून आधी कामासाठी जात असलेल्या जागेचा योग्य मोबदला देण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात व्यापारी लोकांची सभा अक्षय सांस्कृतिक सभागृह कोसरा येथे पार पडली. महामार्ग कामात लोकांना योग्य मोबदला मिळाला पाहिजे, त्याशिवाय बांधकाम करू देणार नाही असे या बैठकीत ठरले आहे. नाली बांधकाम दोन्ही बाजूला सारखे लेव्हलने करावे, यासाठी निवेदन बांधकाम कंपनीला मार्तंड ईखार, जोगेंद्र मक्कड यांच्यासह इतर व्यापारी यांनी दिले आहे.