उमरेड-कऱ्हांडला अभयारण्याचा नामविस्तार करण्याची मागणी

By admin | Published: March 18, 2016 12:36 AM2016-03-18T00:36:11+5:302016-03-18T00:46:49+5:30

पवनी तालुक्यातील सर्वात जास्त वनजमीन उमरेड - कऱ्हांडला अभयारण्यात गेल्यामुळे या अभयारण्याचे उमरेड - कऱ्हांडला - पवनी असे नामविस्तार करण्याची मागणी होत आहे.

Demand for extending the name of the Umred-Karhandal sanctuary | उमरेड-कऱ्हांडला अभयारण्याचा नामविस्तार करण्याची मागणी

उमरेड-कऱ्हांडला अभयारण्याचा नामविस्तार करण्याची मागणी

Next

पवनी : पवनी तालुक्यातील सर्वात जास्त वनजमीन उमरेड - कऱ्हांडला अभयारण्यात गेल्यामुळे या अभयारण्याचे उमरेड - कऱ्हांडला - पवनी असे नामविस्तार करण्याची मागणी होत आहे.
उमरेड - कऱ्हांडला अभयारण्यात पवनी तालुक्यातील १०.५२ चौरास किलोमीटर वनजमीन गेली आहे. ही वनजमीन जवळपास दोन ते अडीच हजार हेक्टर जमीन आहे. या अभयारण्यात पवनी तालुक्याच्या जमिनीचे प्रमाण ४२ टक्के आहे. या अभयारण्याचे पवनी वनपरिक्षेत्रातील जंगल घनदाट, विस्तीर्ण आहे. येथील जंगलात मोठ्या प्रमाणात हरीण, चितळ, सांबर, निलगाय, रानडुकरे यांच्यासोबतच राष्ट्रीय पक्षी मोर, विविध प्रकारचे पक्षी आहेत. येथे बिबट्यांचीही संख्या मोठी आहे.
या अभयारण्याच्या पवनी वनपरिक्षेत्रात भारतातील एक महत्वपूर्ण असलेला जय नामक वाघ व इतर चार वाघ आहेत.
येथील वाघ पर्यटकांना भुरळ घालीत असल्यामुळे दिवसेंदिवस येथील खापरी गेटमधून अभयारण्यात जाणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ होत आहे. या अभयारण्याच्या इतर भागाच्या तुलनेत येथे जास्त पाणवठे असल्यामुळे या पाणवठ्यावर पर्यटकांना हमखास वन्यप्राणी दिसतात. या अभयारण्याला लागनूच विदर्भातील सर्वात मोठे गोसेखुर्द धरण आहे. राज्यातील धरणाला लागून असलेल्या अभयारण्यांना त्या धरणाचे नाव देण्यात आले आहे. पण येथे या अभयारण्याला गोसीखुर्दचे वा पवनीचेही नाव दिले गेले नाही.
या अभयारण्यात पवनी तालुक्यातील सर्वात जास्त वनजमीन गेल्यामुळे या अभयारण्याचे उमरेड कऱ्हांडला पवनी अभयारण्य असे नामकरण नामविस्तारीकरण करण्याची मागणी होऊ लागली आहे. (शहर प्रतिनिधी)

उमरेड कऱ्हांडला अभयारण्यात पवनी वनक्षेत्राची जमीन सर्वात जास्त ४२ टक्के आहे. त्यामुळे या अभयारण्याचे उमरेड कऱ्हांडला पवनी असे अभयारण्य असे नामविस्तार व्हावे याकरिता व्याघ्र प्रकल्पाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पत्र दिले आहे. नामविस्तारासाठी प्रयत्न सुरु आहेत.
- रामचंद्र अवसरे
आमदार

Web Title: Demand for extending the name of the Umred-Karhandal sanctuary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.