शेतकऱ्यांचे कर्ज सरसकट माफ करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2017 01:40 AM2017-03-10T01:40:59+5:302017-03-10T01:40:59+5:30

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तसेच पुरोगामी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समन्वय साधून भंडारा

Demand for farmers' debt totally forgiveness | शेतकऱ्यांचे कर्ज सरसकट माफ करण्याची मागणी

शेतकऱ्यांचे कर्ज सरसकट माफ करण्याची मागणी

Next

भंडारा : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तसेच पुरोगामी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समन्वय साधून भंडारा जिल्ह्यातील लाखनी, साकोली, लाखांदूर, पवनी, भंडारा, मोहाडी, तुमसर या तालुक्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांचे सर्व प्रकारचे कर्ज बिना अट सरसकट माफ करून धान उत्पादक शेतकरी बांधवांना दिलासा द्यावा, अशी मागणी भंडारा जिल्हा विकास संघर्ष समितीचे जिल्हा अध्यक्ष अशोक कान्हेकर, अनिल मेश्राम, नाना गजभिये, गौतम कान्हेकर, अशोक बागडे, धनराज कान्हेकर, राज मेश्राम यांनी एका लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
जिल्ह्यातील शेतकरी बांधव शेतीची मशागत, पेरणी, रोवणी, लागवड यासारखी कामे करण्यासाठी दरवर्षी सरकारी, खाजगी बँका व सावकारी कर्ज काढत असतात. परंतू शेती करत असताना कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकट तर कधी पिकांवर विविध रोगांच्या प्रादुर्भाव होत असल्याने पिक उत्पादनात बरीच घट येत असते तसेच शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या शेतमालाला खर्चावर आधारित हमी भाव मिळत नसल्याने धान उत्पादक शेतकरी बांधव आर्थिक विवंचनेत सापडत असतात. त्यामुळे धान उत्पादक शेतकरी बांधवांना कर्ज फेडणे अशक्य होत असते.
कर्ज फेडण्यासाठी संबंधित एजन्सी तगादा लावत असून जप्ती मारण्याची कारवाई करीत असल्याने शेतकरी बांधवांना नाईलाजास्तव कंटाळून आत्महत्या करावी लागत असून त्याचे कुटूंबावर मोठे संकट कोसळत असते. त्यामुळे शेतीची मशागत कशी करावी, मुलांचे शिक्षण, लग्न कसे करावे, उधार, उसणे, कर्जाची परतफेड कशी करावी असे अनेक प्रश्न धान उत्पादक शेतकरी बांधवासमोर आवासून उभे ठाकले आहे. ज्याप्रमाणे सरकार मोठ मोठ्या उद्योग पतीचे कर्ज माफ करते अगदी त्याचप्रमाणे केंद्र व राज्य सरकारने सम्यक विचार करून वेळीच दखल घेवून भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांचे सर्व प्रकारचे कर्ज विना अट सरसकट माफ करणारा धोरणात्मक निर्णय मुंबई येथील अर्थसंकल्पीय अधिवेशनात घेवून करणारा धोरणात्मक निर्णय मुंबई येथील अर्थसंकल्पीय अधिवेशनात घेऊन योग्य न्याय प्रदान करावा, अशी मागणी अशोक कान्हेकर, अनिल मेश्राम, नाना गजभिये, अशोक नाकडे, गौतम कान्हेकर, राज मेश्राम, धनराज कान्हेकर, हितेंद्र मेश्राम, अशोक फुलेकर यांनी केली आहे. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Demand for farmers' debt totally forgiveness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.