शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची राकाँची मागणी
By admin | Published: March 25, 2017 12:34 AM2017-03-25T00:34:20+5:302017-03-25T00:34:20+5:30
भंडारा जिल्ह्यामध्ये निसर्गाच्या लहरीपणामुळे मागील चार वर्षापासून नापिकीमुळे जिल्ह्यातील शेतकरी कर्जबाजारी झाला आहे.
भंडारा : भंडारा जिल्ह्यामध्ये निसर्गाच्या लहरीपणामुळे मागील चार वर्षापासून नापिकीमुळे जिल्ह्यातील शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर आत्महत्येचा मार्ग स्वीकारावा लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.
यावेळी प्रदेश महासचिव धनंजय दलाल, जिल्हाध्यक्ष मधुकर कुकडे, जि. प. उपाध्यक्ष राजेश डोंगरे, कृषी व पशुसंवर्धन सभापती नरेश डहारे, सभापती शुभांगी रहांगडाले, सुनंदा मुुंडले, कल्याणी भुरे, अविनाश ब्राम्हणकर, महेंद्र गडकरी, मुकेश बावनकर, विनयमोहन पशिने, नरेंद्र झंझाड, मनिष वासनिक, शेखर गभणे, सुभाष वाघमारे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)