कोरोनाच्या सावटातही फळांची मागणी वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2020 05:00 AM2020-04-26T05:00:00+5:302020-04-26T05:00:58+5:30

शहरातील बीटीबीमध्ये आंध्रप्रदेशातून बैगणपल्ली आंबा, नाशिक जिल्ह्यातून येवला येथून द्राक्ष, औरंगाबाद जिल्ह्यातून मोसंबी, अननस अशा फळांची सुमारे ५० टन दैनंदिन आवक सुरू झालेली आहे. त्या प्रमाणामध्ये ग्राहक स्थिरावल्याने सब्जीमंडित फळांच्या विक्रीला मोठा उत्साह तयार झालेला आहे. द्राक्षे केवळ ३० रुपये किलो, आंबे ६० रुपये किलो, अननस पंधरा रुपये नग, अशा स्वस्त दरात उपलब्ध होत आहे.

Demand of fruits in corona | कोरोनाच्या सावटातही फळांची मागणी वाढली

कोरोनाच्या सावटातही फळांची मागणी वाढली

Next
ठळक मुद्देभंडारा येथील बीटीबीमध्ये फळांची आवक वाढली, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फळबागायत लागवडीचे आव्हान

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यातील शेतकरी ताजा भाजीपाला येथील बीटीबी सब्जी मंडीत आणीत कारखानदारी सारखी शेती उपजली आहे. दैनंदिन बागायती शेतीतून मिळणारे उत्पन्नाने शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी बीटीबीने मोठी मदत केलेली असताना आता कोरोनाच्या सावटात फळांची आवक व विक्री सुरू झाली आहे. जिल्ह्यातील शेतकºयांना फळबाग लागवडीचे नवे आवाहन बीटीबीने शेतकऱ्यांना दिले आहे.
शहरातील बीटीबीमध्ये आंध्रप्रदेशातून बैगणपल्ली आंबा, नाशिक जिल्ह्यातून येवला येथून द्राक्ष, औरंगाबाद जिल्ह्यातून मोसंबी, अननस अशा फळांची सुमारे ५० टन दैनंदिन आवक सुरू झालेली आहे. त्या प्रमाणामध्ये ग्राहक स्थिरावल्याने सब्जीमंडित फळांच्या विक्रीला मोठा उत्साह तयार झालेला आहे. द्राक्षे केवळ ३० रुपये किलो, आंबे ६० रुपये किलो, अननस पंधरा रुपये नग, अशा स्वस्त दरात उपलब्ध होत आहे. फळांना वाढलेली मागणी शेतकऱ्यांसाठी हिताची आहे.

शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या अनुषंगाने भाऊसाहेब फुंडकर फलोत्पादन योजनेअंतर्गत शंभर टक्के अनुदानावर फळबाग व सिंचन योजनेची तरतूद केलेली आहे. शेतकऱ्यांनी आपल्या शेतीचा, हवामानाचा अंदाज घेता आपल्या भागात होणारी फळबाग लागवड करीत शासनाच्या योजनेचा लाभ घ्यावा, भाजीपालासह फळबागायती चालना द्यावी.
- पद्माकर गिदमारे, तालुका कृषी अधिकारी, लाखनी
भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पश्चिम महाराष्ट्रातील शेतकºयांचा आदर्श घेत आपल्या शेतीमध्ये फळबाग लागवड करावे. कृषी विभागाचे सुद्धा याला शंभर टक्के अनुदान मिळत आहे. भाजीपाला सोबत फळबागेचे नियोजन केल्यास निश्चित आपली उन्नती साधण्यास मोठी मदत होईल. जिल्ह्यात फळांना मोठी मागणी असून दररोज किमान ५० टन फळांची विक्री होत आहे.
- बंडू बारापात्रे, अध्यक्ष, बीटीबी सब्जीमंडी, भंडारा.

फळबागायतीतून शेतकरी साधणार प्रगती
कोरोनाच्या सावटात शेतकऱ्याशी एकनिष्ठ राहत बीटीबीने शासन व प्रशासनाने दिलेल्या निर्देशांचे तंतोतंत पालन करीत शेतकºयांचा भाजीपाला विकत शेतकऱ्यांना प्रामाणिकतिने न्याय दिलेला आहे. तसेच जिल्ह्यातील नागरिकांना सुद्धा माफक दरामध्ये भाजीपाला पूरवत आर्थिक समस्यांच्या काळामध्ये एक प्रेरणादायी उदाहरण महाराष्ट्रात उभा केलेला आहे. भाजीपाल्याच्या चिल्लर दुकानदारांना फळ विक्री करताना आनंद होत आहे. फळ आणि भाजीपाला एकाच दुकानात मिळत असल्याने ग्राहकांना सुद्धा याचा लाभ घेताना अडचण दूर आहे. शेतकऱ्यांनी फळबागायतीतून उन्नती साधण्याचे आवाहन आहे.

पूरक व्यवसाय
मराठवाड्यातील शेतकºयांचा आदर्श जिल्ह्यातील शेतकºयांनी घेत शेतीत नवनवीन बदल करून फळबागायती चे क्षेत्रफळ नक्कीच वाढवायला पाहिजे. वातावरणात होणारे फळबाग कृषी विभागामार्फत मार्गदर्शन नियमित केलेले आहे त्या अनुषंगाने फळबागायतीची मानसिकता तयार असे आवाहन कृषी तज्ज्ञ सुधीर धकाते यांनी केलेले आहे.

Web Title: Demand of fruits in corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.