मांग, गारुडी समाज योजनांपासून वंचित
By admin | Published: July 3, 2015 12:58 AM2015-07-03T00:58:11+5:302015-07-03T00:58:11+5:30
भटक्यांमध्ये गणल्या जाणाऱ्या मांग गारुडी समाजाची अवस्था आज बिकट आहे. गावोगावी भटकून कुटूंबाचे पोषण करताना वास्तव्याचा ठोस पुरावा नाही.
व्यथा : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
भंडारा : भटक्यांमध्ये गणल्या जाणाऱ्या मांग गारुडी समाजाची अवस्था आज बिकट आहे. गावोगावी भटकून कुटूंबाचे पोषण करताना वास्तव्याचा ठोस पुरावा नाही. शिक्षणाचा अभावामुळे दाखला नाही. मुख्य प्रवाहात येऊन स्थिरावू इच्छीत आहे. मांग गारुडी समाजातील मुले, मुली शिक्षण घेण्यासाठी जात प्रमाणपत्र अडसर ठरत आहे, या आशयाचे निवेदन पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
समाजातील लोकांना १९५२ पूर्वीचा पूर्वजांचा दाखल देणे शक्य नसल्याने त्यांना जात प्रमाणपत्र शासनाकडून देण्यास टाळले जात आहे. यामुळे शासकीय योजनांचा लाभ मिळू शकत नाही. हे प्रमाणपत्र मिळावे म्हणून अनेक वर्षांपासून लढा सुरु आहे. निवेदन देताना शंकर दोनाडे, बाबूराव शेंडे, विहीपचे संघटनमंत्री सागर खेडकर, दिपक कुंभरे, बसूराज खडसे, शर्मा दोनाडे, विक्की पात्रे, शिवा कांबळे, आनंद खडसे, दशमा शेंडे, अजीत दोनाडे, राजन गायकवाड, रघू कांबळे, रामकला खडसे, रोशनी गायकवाड, गोपी दोनाडे, रवी शेंडे, कारुसेन लोंडे, शुभम शेंडे, मेघा लोंढे, रमसींग शेंडे उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)