दिव्यांग, निराधारांना तत्काळ मानधन देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:40 AM2021-09-12T04:40:25+5:302021-09-12T04:40:25+5:30
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत सामाजिक अर्थसहाय्य योजना अंतर्गत या योजना राबविल्या जातात. यामध्ये प्रामुख्याने संजय गांधी निराधार ...
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत सामाजिक अर्थसहाय्य योजना अंतर्गत या योजना राबविल्या जातात. यामध्ये प्रामुख्याने संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना यांसारख्या विविध योजना शासनामार्फत राबविल्या जातात. कोरोनामुळे अनेक दिव्यांग रोजगारापासून वंचित आहेत. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे; तसेच दिव्यांगांचा स्थानिक स्वराज्य संस्थांकडे असलेला पाच टक्के राखीव निधी अनेक ग्रामपंचायतींनी, नगर परिषद यांनी वाटप केला नाही. दिव्यांगाच्या स्वतंत्र अंत्योदय शिधापत्रिका तयार करण्यात याव्या. यांसह मानधन तत्काळ खात्यावर जमा करावे, अशी मागणी प्रहार अपंग क्रांती आंदोलनाचे जिल्हा अध्यक्ष रवी मने यांनी केली आहे. यावेळी जिल्हा सचिव योगेश घाटबांधे, लाखनी तालुका अध्यक्ष सुनील कहालकर, लाखनी तालुका सचिव सुनील हटवार, लाखनी शहर अध्यक्ष रामचंद्र निर्वाण, लाखनी शहर सचिव प्रेमचंद्र निर्वाण, दिनेश गिदमारे उपस्थित होते.