नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना त्वरित अनुदानाची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:38 AM2021-09-27T04:38:41+5:302021-09-27T04:38:41+5:30
महाविकास आघाडी सरकारने एक वर्षापूर्वी महात्मा जोतिबा फुले कर्जमुक्ती योजना सुरु केली. त्या योजनेंतर्गत थकबाकी असणाऱ्या शेतकऱ्यांचे दोन लाख ...
महाविकास आघाडी सरकारने एक वर्षापूर्वी महात्मा जोतिबा फुले कर्जमुक्ती योजना सुरु केली. त्या योजनेंतर्गत थकबाकी असणाऱ्या शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंत कर्ज माफ केले. जे शेतकरी नियमित कर्जफेड करतात, अशा शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये देण्याची घोषणा शासनाने केली होती. मात्र, या घोषणेप्रमाणे प्रामाणिकपणे नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना अजूनपर्यंत पन्नास हजार रुपयांची मदत मिळालेली नाही. ही अत्यंत वेदनादायी बाब असून शासन प्रामाणिकपणे कर्जफेड करणा-या शेतकऱ्यांची थट्टा करीत आहे. यासाठी अन्यायग्रस्त शेतकरी संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर भिवगडे, कोठीराम पवनकर, विष्णुदास लोणारे, पुरुषोत्तम गायधने, ग्यानीराम ढेंगे, मोहन भोपे, किसन राहाटे, पुरुषोत्तम मोहतुरे, विनोद गायधने, दादाराम गायधने, दिनेश भोपे, बाळकृष्ण बोरकर, धनराज राहाटे, मुकेश आवरकर यांनी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार नाना पटोले यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन दिले.