ओबीसी जनगणनेची मागणी व जनजागृती उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:36 AM2021-01-25T04:36:09+5:302021-01-25T04:36:09+5:30
भंडारा : ओबीसी समाजाची संख्या देशात सर्वात जास्त असूनही स्वातंत्र्यानंतर ओबीसी समाजाला जाणीवपूर्वक डावलण्यात आले. केंद्र सरकारने जनगणना २०२१चा ...
भंडारा : ओबीसी समाजाची संख्या देशात सर्वात जास्त असूनही स्वातंत्र्यानंतर ओबीसी समाजाला जाणीवपूर्वक डावलण्यात आले. केंद्र सरकारने जनगणना २०२१चा कार्यक्रम जाहीर केला होता. त्याबाबत नमुना चाचणी ऑगस्ट, २०१९ला करण्यात आली होती. त्या नमुना प्रश्नावलीत ओबीसी समाजाच्या जगण्याबाबत उल्लेख नव्हता. ओबीसी क्रांती मोर्चा भंडाराच्या वतीने मकर संक्रांतीला सणानिमित्ताने जनगणना २०२१ मध्ये ओबीसीच्या कॉलम नाही, म्हणून जनगणनेत ओबीसी समाजाचा सहभाग नाही, असा संदेश पतंगीवर लिहून आकाशात पतंग उडवत, ओबीसी प्रवर्गामार्फत सरकारला ओबीसी जनगणनेची मागणी व जनजागृतीसाठी उपक्रम संकल्पना निमित्त राबविण्यात आले.
स्वातंत्र्यपूर्वकाळात १९३१ला ओबीसीची जनगणना झाली होती. त्यानुसार, देशात ओबीसी समाजाची संख्या ५२ टक्के होते. ओबीसी समाजाची संख्या देशात सर्वात जास्त असूनही स्वातंत्र्यानंतर ओबीसी समाजाच्या जाणीवपूर्वक आघात करत डावलण्यात आले. ओबीसी समाजात मोठा असंतोष आहे. जनगणना २०२१ मध्ये ओबीसीचा कॉलम नाही, म्हणूनच आमचा सहभाग नाही, डॉक्टर अंजली साळवे विटणकर यांनी पाटी लावा मोहीम सुरू केली. ओबीची क्रांती मोर्चा महाराष्ट्र भंडारा जिल्ह्यात अनेक वर्षांपासून घराघरावर पाटील लावा मोहीम सुरू आहे. मकर संक्रांतीला पाटीचे वाण देऊन ही मोहीम ओबीसी जनगणना याबाबत जागृतीसाठी राबविण्यात आली आहे. उपक्रमांतर्गत क्रांती मोर्चा मुख्य संयोजक अध्यक्ष संजय मते, अमरदीप भुरे, जीवन भजनकर, किरण मते, शोभा बावनकर, राजेश इसापुरे, पुरुषोत्तम नंदुरकर, यशवंत सूर्यवंशी, सुधाकर कावळे, नितीन नागदेवे, नकुल मते, मारुती राऊत, कल्याणी मते, काजल ठवकर व विद्यार्थी उपस्थित होते.