‘त्या’ जागेवरच ओपन जिम लावण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:41 AM2021-09-24T04:41:08+5:302021-09-24T04:41:08+5:30

ग्रामपंचायत ठरावानुसार विवेकानंद काॅलनी येथे ओपन जिम लावण्याचा प्रस्ताव मंजुरीकरिता देण्यात आला होता. त्यानुसार क्रीडा साहित्य ग्रामपंचायतमध्ये आले ...

Demand for open gym in 'that' place | ‘त्या’ जागेवरच ओपन जिम लावण्याची मागणी

‘त्या’ जागेवरच ओपन जिम लावण्याची मागणी

Next

ग्रामपंचायत ठरावानुसार विवेकानंद काॅलनी येथे ओपन जिम लावण्याचा प्रस्ताव मंजुरीकरिता देण्यात आला होता. त्यानुसार क्रीडा साहित्य ग्रामपंचायतमध्ये आले आहे. गत आठवड्यात १६ सप्टेंबरच्या ग्रामपंचायतच्या मासिक सभेत सभाअध्यक्ष सरपंच सुषमा पवार यांच्या उपस्थितीत उपसरपंच अरविंद तिरपुडे, सदस्य रामचंद्र केंद्रले, प्रशांत ढोमणे, प्रशांत देशभ्रतार, प्रमिला मेश्राम, जयश्री काटेखाये, वैशाली देशभातर, रूपलता भागवत यांच्या उपस्थितीत सार्वजनिक वाचनालयाच्या ठिकाणी ओपन जिम लावण्याचा ठराव बहुमताने पारीत करण्यात आला. या ठरावाबाबत प्रास्तावित वार्डनिवासीयांना कळताच लगेच सरपंच सुषमा पवार यानां वार्ड क्रमांक दोनचे नागरिकांनी सदर ठरावास विरोध दर्शवला. तीन वर्षांपूर्वी प्रास्तावित विवेकानंद वार्डात लावण्याची मागणी केली आहे. सार्वजनिक वाचनालय ठिकाणी ओपन जिम लावल्यास आंदोलनाचा इशारा वार्डवासीयांनी निवेदनातून दिला आहे. निवेदन देताना प्रा. चंद्रशेखर गिरडे, रामचंद्र कारेमोरे, सुभाष वाडीभस्मे, पुरुषोत्तम कांबळे, पांडुरंग निशाणे, केशव पवार, अनिल भोंगाडे, रविकांत अहिरवार, राजेश ठवकर, संदीप ठवकर, राम देशमुख, संजय खापर्डे, सहादेव फाये, श्रीकांत वंजारी, किशोर दंडारे तसेच अनेक नागरिक तथा माजी सैनिक संघटना ठाणाचे पदाधिकारी होते.

Web Title: Demand for open gym in 'that' place

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.