रब्बी धानाचे चुकारे अदा करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:38 AM2021-08-19T04:38:54+5:302021-08-19T04:38:54+5:30
उन्हाळी धान विक्री करीत असताना शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रांवर बारदान उपलब्ध नसल्याने शासन निर्देशानुसार शेतकऱ्यांकडून ज्युटच्या बारदान्यात धान ...
उन्हाळी धान विक्री करीत असताना शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रांवर बारदान उपलब्ध नसल्याने शासन निर्देशानुसार शेतकऱ्यांकडून ज्युटच्या बारदान्यात धान खरेदी करण्यात आले. शेतकऱ्यांकडे ज्युटचा बारदान नसल्याने संबंधित शेतकऱ्यांनी उधार-उसने पैसे घेऊन बारदान विकत घेऊन धानाची विक्री केली. मात्र तब्बल अडीच महिने लोटूनही धानाचे चुकारे न मिळाल्याने बारदानाचे पैसे कुठून द्यावे, हा प्रश्न आहे. यासह गतवर्षीच्या खरिपातील धानाला शासनाने ७०० रुपये प्रतिक्विंटल बोनस जाहीर केले. मात्र त्यापैकी केवळ अर्धे बोनस दिले आहेत व उर्वरित अर्धे बोनस शिल्लक आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहन निधी शासनाने देण्याचे आश्वासित केले होते. सद्य घडीला तालुक्यातील शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.
शिष्टमंडळात जिल्हा परिषदेचे माजी सभापती चंद्रशेखर टेंभुर्णे, प्रहारचे जिल्हा उपाध्यक्ष धनराज हटवार, श्रावण शहारे, रवींद्र शहारे, अरविंद रामटेके, प्रल्हाद मिसार, विकास धनविजय, हिरामण बनकर आदींचा समावेश होता.
180821\img-20210818-wa0021.jpg
तहसिलदारांमार्फत निवेदन देतांना चंद्रशेखर टेंभुर्णे, धनराज हटवार व अन्य शेतकरी