किसानविरोधी कायदे रद्द करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:36 IST2021-01-23T04:36:20+5:302021-01-23T04:36:20+5:30
याप्रसंगी भाकपचे जिल्हा सचिव हिवराज उके, कॉम्रेड वामनराव चांदेवार, प्रियकला मेश्राम, रतन मंत्री यांनी मनोगत व्यक्त केले. केंद्र ...

किसानविरोधी कायदे रद्द करण्याची मागणी
याप्रसंगी भाकपचे जिल्हा सचिव हिवराज उके, कॉम्रेड वामनराव चांदेवार, प्रियकला मेश्राम, रतन मंत्री यांनी मनोगत व्यक्त केले. केंद्र सरकारने किसानविरोधी कायदे, कामगारविरोधी कायदे मागे घ्यावे, अशी मागणी महिला किसान दिन समारंभात करण्यात आली. शेती व्यवसायात महिलांचा वाटा व सहभाग हा मोठ्या प्रमाणात असतो त्यामुळे आंदोलनातदेखील आम्ही मागे असणार नाही तसेच शेतकऱ्यांच्या मागण्या सरकारने पूर्ण न केल्यास २६ जानेवारीला दुपारी एक वाजता त्रिमूर्ती चौक भंडारा येथे प्रजासत्ताक दिनी आंदोलनात महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे, असे आवाहन अध्यक्षा महानंदा गजभिये यांनी केले.
संचालन भाकपचे गजानन पाचे यांनी केले. याप्रसंगी छबी पाचे, उर्मिला वासनिक, गौतम भोयर, दिलीप क्षीरसागर, शीला शामकुवर, गणेश चिचामे, सोमा टेकाम, रमेश झोडे, वर्षा मेश्राम प्रियदर्शना उके, गोपाल चौकर, शुभम उके, घनश्याम नागोसे आदींची उपस्थिती होती.