किसानविरोधी कायदे रद्द करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 04:17 AM2021-01-24T04:17:03+5:302021-01-24T04:17:03+5:30
भंडारा : भारतीय महिला फेडरेशन, किसान सभा व भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या संयुक्त विद्यमाने अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या ...
भंडारा : भारतीय महिला फेडरेशन, किसान सभा व भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या संयुक्त विद्यमाने अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या आवाहनानुसार महिला किसान दिन समारंभाचे आयोजन येथील राणा भवनात करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी महिला फेडरेशनच्या महानंदा गजभिये होत्या.
याप्रसंगी भाकपचे जिल्हा सचिव हिवराज उके, वामनराव चांदेवार, प्रियकला मेश्राम, रतन मंत्री यांनी मनोगत व्यक्त केले. केंद्र सरकारने किसान विरोधी कायदे, कामगार विरोधी कायदे मागे घ्यावे, अशी मागणी महिला किसान दिन समारंभात करण्यात आली. शेती व्यवसायात महिलांचा वाटा व सहभाग हा मोठ्या प्रमाणात असतो त्यामुळे आंदोलनातदेखील आम्ही मागे असणार नाही तसेच शेतकऱ्यांच्या मागण्या सरकारने पूर्ण न केल्यास २६ जानेवारीला दुपारी १ वाजता त्रिमूर्ती चौक भंडारा येथे आंदोलनात महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे, असे आवाहन अध्यक्ष महानंदा गजभिये यांनी केले.
संचालन भाकपचे गजानन पाचे यांनी केले. याप्रसंगी छबी पाचे, उर्मिला वासनिक, गौतम भोयर, दिलीप क्षीरसागर ,शीला श्यामकुवर, गणेश चिचामे, सोमा टेकाम, रमेश झोडे, वर्षा मेश्राम प्रियदर्शना उके, गोपाल चौकर, शुभम उके, घनश्याम नागोसे आदींची उपस्थिती होती.