शिष्यवृत्तीच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांचा तहसीलवर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 10:34 PM2017-09-16T22:34:48+5:302017-09-16T22:35:06+5:30

यापूर्वी अनुसूचित जाती, जमातीच्या विद्यार्थ्यांना मिळणारी शिष्यवृत्ती राज्य शासनाने दिली नसल्याने मोठ्या आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे त्यामुळे विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती शासनाने त्वरित द्यावे,

For the demand of scholarship, the front of the tehsil of students | शिष्यवृत्तीच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांचा तहसीलवर मोर्चा

शिष्यवृत्तीच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांचा तहसीलवर मोर्चा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
लाखांदूर : यापूर्वी अनुसूचित जाती, जमातीच्या विद्यार्थ्यांना मिळणारी शिष्यवृत्ती राज्य शासनाने दिली नसल्याने मोठ्या आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे त्यामुळे विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती शासनाने त्वरित द्यावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा सज्जड इशारा शनिवारला लाखांदूर येथे काढण्यात आलेल्या बहुजन रिपब्लिकन विध्यार्थी मोर्च्याच्या वतीने देण्यात आला.
बहुजन रिपब्लिकन विद्यार्थी मोर्चा लाखांदूर तालुक्याच्या वतीने आज शनिवारी तहसील कार्यालयावर विविध मागण्यांना घेऊन मोर्च्याचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ११ वाजता येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयासमोरून मोर्च्याची सुरुवात करण्यात आली. मोर्च्यात लाखांदूर तालुक्यातील बहुतांश विद्यार्थी सहभागी झाल्याने मोर्च्यात जवळपास दीड हजाराच्यावर विद्यार्थी सहभागी झाले होते. विविध घोषणा देत मोर्चा येथील तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर आल्यावर मोर्च्याचे रुपांतर सभेत झाले. यावेळी बीआरव्हिएम चंद्रपूरचे राजू झोडे यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली. यावेळी वैशाली रामटेके ब्रम्हपुरी, अभिलाषा गजघाटे नागपूर, भंडारा जिल्हाध्यक्ष योगेश शेंडे, गोंदिया जिल्हाध्यक्ष देवेश शेंडे, निशांत बडोले, फिरोज रामटेके, शाहरुख पठाण, चेतन अलोने नागपूर, भूषण शामकुवर नागपूर यांच्यासह बीआरव्हीएमचे पदाधिकारी मंचावर उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना राजू झोडे यांनी सरकारच्या ध्येयधोरणावर सडाडून टीका करताना विद्यमान सरकार विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती रोखून त्यांना अडचणीत आणू पाहत आहे. राज्याचे मुख्यमंत्री हे जेव्हा विरोधी पक्षात होते त्यावेळी शेतकरी आत्महत्येवर पोटतिडकीने ओरडून सरकारवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करीत होते. मात्र आता मुख्यमंत्री झाल्यावर राज्यात जवळपास साडेपाच हजार शेतकºयांनी कर्जाला कंटाळून आत्महत्या केली आहे.
सरकारवर मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल करण्यात येवू नये, असा सवाल उपस्थित केला. मागील दोन वषार्पासून थकीत असलेली शिष्यवृत्ती त्वरित खात्यात जमा करावी, ओबीसी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती कपात न करता उलट वाढ करण्यात यावी, सेमिस्टर परीक्षा पद्धत बंद करण्यात यावी, शिक्षणाचे खासगीकरण व बाजारीकरण थांबवावे, नागपूर विद्यापिठाच्या परीक्षेचा गोंधळ थांबवावे, विद्यार्थ्यांसाठी बसेस वाढवाव्या, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्या, शेतकºयांना सरसकट कर्जमाफी द्यावी, यासह अन्य १६ मागण्यांचे निवेदन यावेळी तहसीलदार संतोष महल्ले यांना देण्यात आले. यावेळी आशिष गजभिये, विष्णू बुरडे, जयश्री रामटेके, प्रीती परशुरामकर, प्रगती रामटेके, पुष्पा कांबळे, रोशन मेंढे, प्रकशित बडोले, अन्केश सुखदेवे, प्रशांत तुपटे, कल्पना हातवार, रवी फुंडे, सुरज प्रधान, बलवान गायकवाड, सादाफ शेख, सुरज अन्डेल, भरत राऊत, विभा मेश्राम, दिपाली तलमले, अमोल नागदेवे, अश्विन मोटघरे, त्रिलोक बडोले समीर मरघडे,शीतल हुमे, प्रियांका मेश्राम, तनुजा बन्सोड, रत्नदीप टेंभूर्ने, सुभेद रामटेके, माधुरी ठाकरे, स्नेहल शिंगाडे, अजय मेश्राम, आम्रापाली नागदेवे, अमरदीप तिरपुडे, श्रद्धा कोटांगले, तनुजा रामटेके, अर्चना सौन्दारकर, राजश्री रंगारी, किरण बदेले, रुपाली भांडारकर, विश्वास ठाकरे, अश्विन नागोसे, माधुरी परशुरामकर, डिम्पल कुंभरे, शैलेश पिल्लेवान, वैभव बनकर, शुभम निंबेकर, भूषण लांडगे, निलेश मोटघरे, अल्का बेदरे, राष्ट्रपाल जांगळे, भोजराज फुंडे, समीर गजभिये, प्रणय धाकडे, आदींनी सहकार्य केले. पोलीस निरीक्षक मंडलवार यांच्या नेतृत्वात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Web Title: For the demand of scholarship, the front of the tehsil of students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.