सर्पदंश उपचाराची लस उपलब्ध करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:34 AM2021-07-29T04:34:55+5:302021-07-29T04:34:55+5:30
सर्पदंशानंतर मनराज गाढवे यांना निलज येथील उपकेंद्रात नेण्यात आले. परंतु, तेथे डॉक्टर व कर्मचारीही हजर नव्हते. लगेच त्यांना करडी ...
सर्पदंशानंतर मनराज गाढवे यांना निलज येथील उपकेंद्रात नेण्यात आले. परंतु, तेथे डॉक्टर व कर्मचारीही हजर नव्हते. लगेच त्यांना करडी प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले गेले. परंतु, येथे सर्पदंशावर उपचारांसाठी लस नव्हती. या सर्व प्रकारात भंडारा येथे नेत असताना रस्त्यातच मृत्यू झाला. लस असती तर जीव वाचला असता अशी भावना गावकऱ्यांची आहे. सर्पदंशाच्या घटना अलीकडे मोठ्या प्रमाणात वाढल्या आहे. मात्र, देव्हाडा परिसरातील आरोग्य केंद्र व उपकेंद्रामध्ये सर्पदंश उपचारांसाठी औषध उपलब्ध नाहीत. करडी केंद्रामध्येही सापावर उपचार करणारे औषध उपलब्ध नसल्याने उपचारांअभावी जीव जात आहे. परिणामी या केंद्रामध्ये तत्काळ सर्पदंशाचे औषध उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
280721\img_20210728_115042.jpg
करडी आरोग्य केंद्रात सर्पदंश उपचाराची लस उपलब्ध करा