तुमसरमध्ये स्पर्धा परीक्षा अभ्यासिका सुरू करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2021 04:13 AM2021-08-02T04:13:03+5:302021-08-02T04:13:03+5:30
तुमसर तालुका हा राज्याच्या शेवटच्या टोकावर असून येथील विद्यार्थी ग्रामीण भागातील विशेषत: शेतकरी कुटुंबातून आहेत. तसेच अनुसूचित जाती, जमाती, ...
तुमसर तालुका हा राज्याच्या शेवटच्या टोकावर असून येथील विद्यार्थी ग्रामीण भागातील विशेषत: शेतकरी कुटुंबातून आहेत. तसेच अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्गीय व अल्पसंख्याक विद्यार्थ्यांची मोठी संख्या आहे. सदर विद्यार्थ्यांना तुमसर शहरातील विनोबानगरात बावनथडी प्रकल्प कार्यालयजवळ जागा उपलब्ध आहे. तिथे स्थानिक विकास निधीअंतर्गत सुसज्ज अभ्यासिका उभारावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
येथील विद्यार्थ्यांची आर्थिक स्थिती ही बेताची असून त्यांच्या शैक्षणिक विकासासाठी व प्रशासकीय परीक्षेत यशस्वी होण्याकरिता अभ्यासिका केंद्राची नितांत गरज आहे. येथे अभ्यासिका उभारली गेली तर तालुक्यातील विद्यार्थ्यांना मोठी मदत होईल. प्रशासकीय सेवा परीक्षेकरिता त्यांना शहरांमध्ये सध्या जावे लागते. तिथे जाऊन राहणे व इतर खर्च करणे परवडणारे नाही. त्यामुळे तुमसर शहरात अभ्यासिका केंद्राकरिता स्थानिक विकास निधीअंतर्गत निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.