डोंगरगाव येथील धान खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:23 AM2021-06-22T04:23:59+5:302021-06-22T04:23:59+5:30
धानाचे पीक हाती येऊनही केंद्र सरकारच्या धोरणानुसार मे महिन्याच्या सुरुवातीला सर्व धान खरेदी केंद्र सुरू होणे अपेक्षित असताना राज्य ...
धानाचे पीक हाती येऊनही केंद्र सरकारच्या धोरणानुसार मे महिन्याच्या सुरुवातीला सर्व धान खरेदी केंद्र सुरू होणे अपेक्षित असताना राज्य शासनाच्या शेतकाऱ्यांप्रती उदासीन दिसत आहे. खरीप हंगामाला सुरुवात झाल्यावर ९ उन्हाळी धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. राज्य शासनाने केंद्र बंद करण्याची मुदत कमी देऊन शेतकऱ्यांची थट्टा केली असल्याने अनेक शेतकरी धान विक्रीपासून वंचित राहणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसणार आहे. ज्या ठिकाणी गोदाम नाहीत अशा ठिकाणी मोजकेच धान खरेदी केंद्र उघडण्यात आले असून उलट-पालट गावे जोडण्यात आली आहेत. त्यामुळे आधीच कर्जाने खचलेला शेतकरी पुन्हा कर्जाच्या खाईत ढकलला जात आहे. शासनाने तत्काळ डोंगरगाव येथील धान खरेदी केंद्रावर बारादाना पाठवून धान खरेदी सुरू करावी. अन्यथा शेतकऱ्यांसहित रस्त्यावर उतरू, अशा इशारा भाजपाचे कार्यकारिणी सदस्य सुभाष गायधने यांनी दिला आहे. निवेदन देताना भाजपा तालुका अध्यक्ष हंसराज आगाशे, माजी सभापती हरिश्चंद्र बंधाटे, सुनील मेश्राम, विनायक बुरडे, नरेंद्र बंधाटे, संजय दमाहे, भीम बारई, राधेश्याम बांडेबुचे, शेतकरी उपस्थित होते.