रेतीची अवैध वाहतूक थांंबविण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:33 AM2021-03-24T04:33:20+5:302021-03-24T04:33:20+5:30
पवनी तालुक्यात अजूनही अनेक घाटांचे लिलाव झाले नाहीत. कुर्झा, इटगाव रेती घाट लिलाव झाले आहेत, पण इतर रेती लिलाव ...
पवनी तालुक्यात अजूनही अनेक घाटांचे लिलाव झाले नाहीत. कुर्झा, इटगाव रेती घाट लिलाव झाले आहेत, पण इतर रेती लिलाव न झाल्याने येथे रेतीचा अवैध उपसा सुरू आहे. या सर्व प्रकाराकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे खुलेआम वाहतूक सुरू आहे. रेतीची वाहतूक ट्रक, ट्रॅक्टर या वाहनाने होते. या प्रकाराकडे पोलीस प्रशासनदेखील दुर्लक्ष करीत असल्याने यामध्ये मिलीजुली असल्याने हे सर्व प्रकार होत आहेत. रेतीची अवैध वाहतूक करण्यासाठी मोठी बोलणी होत असल्याचे कळते, तसेच लहान लहान ट्रॅक्टरने रेती वाहतूक करणारे ज्या ठिकाणी रेती पोहोचवायची आहे तेथील तलाठी, मंडळ निरीक्षक यांनादेखील महिन्याचे ठरावीक रुपये दिले जात असल्याची माहिती आहे. घरकुल बांधकाम करणाऱ्या लोकांना रेती मिळत नाही अशी परिस्थिती आहे. तेव्हा याचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात येत आहे.