ठाणा निहारवानी रस्त्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2017 12:29 AM2017-09-02T00:29:27+5:302017-09-02T00:30:24+5:30
ठाणा ते निहारवाणी या दोन गावांना महामार्गाशी जोडण्याच्या दृष्टिने निहारवानी ते ठाणा दीड किलोमीटरचा रस्ता डांबरीकरण करण्याच्या मागणीचे निवेदन ......
लोकमत न्यूज नेटवर्क
जवाहरनगर : ठाणा ते निहारवाणी या दोन गावांना महामार्गाशी जोडण्याच्या दृष्टिने निहारवानी ते ठाणा दीड किलोमीटरचा रस्ता डांबरीकरण करण्याच्या मागणीचे निवेदन सहपालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना देण्यात आले.
गावातील शेतकरी शेतमजुर, व्यापारी, विद्यार्थी शिक्षकांनी दळणवळणाच्या सुविधा पुरविल्यास जिल्ह्याच्या टोकावर असलेल्या ठाणा व निहारवानी गावाच विकास होण्यासाठी मदत होणार आहे. गतिमान विकासासाठी निहारवानी हे नागपूर जिल्ह्यातील गाव व ठाणा हे भंडारा जिल्ह्यातील गाव या दोन्ही गावाला जोडणारा ग्राममार्ग थेट राष्ट्रीय महामार्गाला जोडण्यासाठी व हा कच्चा रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करण्यात यावे, ठाणा निहारवाणी नाल्यावर पुल बांधण्यात यावा, चिखली ते दहेगाव नाल्यावर पुल बांधण्यात यावा, या आशयाचे निवेदन देण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य चंद्रप्रकाश दुरूगकर, तालुका उपाध्यक्ष आशिष हटवार, प्रशांत ढोमणे, विनोद गनगणे, विनोद हाडगे, देवेंद्र बडवाईक, विजय निनावे, संजय पडोळे, पंकज हरडे, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष जयपाल लांजेवार यांनी ना.चंद्रशेखर बावणकुळे यांना ठाणा येथील जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी देण्यात आले.