रावणदहन प्रथा बंद करण्याची आदिवासी संघटनेची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2018 01:09 AM2018-10-05T01:09:08+5:302018-10-05T01:09:53+5:30

आदिवासी समाजबांधव राजा रावण यांना संस्कृतीचे दैवत मानतात. त्यामुळे रावण दहन प्रथा बंद करण्यात यावी अशी मागणी नॅशनल आदिवासी पिपल्स वुमन्स स्टूडंन्स फेडरेशन नागपूर शाखा लाखनीचे तालुकाध्यक्ष मुकेश धुर्वे यांनी लाखनीच्या तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

Demand for the tribal organization to stop the practice of Ravana Dahan | रावणदहन प्रथा बंद करण्याची आदिवासी संघटनेची मागणी

रावणदहन प्रथा बंद करण्याची आदिवासी संघटनेची मागणी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : आदिवासी समाजबांधव राजा रावण यांना संस्कृतीचे दैवत मानतात. त्यामुळे रावण दहन प्रथा बंद करण्यात यावी अशी मागणी नॅशनल आदिवासी पिपल्स वुमन्स स्टूडंन्स फेडरेशन नागपूर शाखा लाखनीचे तालुकाध्यक्ष मुकेश धुर्वे यांनी लाखनीच्या तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
आदिवासी संस्कृतीचे श्रध्दास्थान अधिष्ठान मानल्या जाणारा राजा रावण हा स्त्री रक्षणकर्ता होता. तामिळनाडूमध्ये रावणाची ३५२ मंदिरे आहेत. सर्वातमोठी मुर्ती मध्यप्रदेशातील मंदसौर येथे अंदाजे १५ मीटर उंचीची आहे. रावण हे आदिम संस्कृतीचे प्रतिक दैवत व श्रध्दास्थान आहे.
परंतु आदिवासींच्या या पराक्रमी राजाला जाळण्याची परंपरा जाणीवपुर्वक निर्माण करण्यात आली आहे. त्यामुळे देशातील आदिवासी समाजबांधवांच्या भावना दुखावल्या जातात. रावण दहणाची प्रथा बंद करावी अशी मागणी आहे.

Web Title: Demand for the tribal organization to stop the practice of Ravana Dahan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dasaraदसरा