आधी लगीन लोकशाहीचं, नवरदेवाने मुंडावळी बांधून लग्नाआधी केले मतदान
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2024 12:45 IST2024-04-19T12:40:27+5:302024-04-19T12:45:32+5:30
आधी लगीन लोकशाहीच् म्हणत पालांदूर येथील गणेश टिकाराम कावळे नामक नवरदेवाने स्वतःच्या लग्नाआधी मतदान करून लोकशाही चे लग्न समजत वराड्यासह मतदान पार पाडले.

Bhandara polling booth
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : मतदानाच्या राष्ट्रीय कर्तव्याला प्राधान्य देत लाखनी तालुक्यातील पालांदूर येथील गणेश टिकाराम कावळे या नवरदेवाने वरात निघण्याआधी मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले. आधी लगीन लोकशाहीचे, अशी प्रतिक्रिया आता गावात उमटत आहे.
डोक्याला मुंडावळ्या बांधून वऱ्हाड्यांसह गणेश हा युवक लाखांदुरातील मतदान केंद्रावर सकाळीच दाखल झाला. रांगेत लागून त्याने स्वत: आणि त्याच्या नातेवाईकांनी मतदानाचा हक्क बजावला. एवढेच नाही, तर राष्ट्रीय कर्तव्य बजावल्याची पोजही त्याने ‘लोकमत’ प्रतिनिधीला दिली. त्यानंतर वरातीसह ते सर्वजण वधुच्या गावाकडे मार्गस्थ झाले.