प्रकल्प कालव्याच्या पाटचाऱ्याची तोडफोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2020 05:00 AM2020-04-23T05:00:00+5:302020-04-23T05:01:08+5:30
तालुक्यातील गर्रा येथील काही अज्ञात लोकांनी स्वार्थ साधण्यासाठी बावनथडी प्रकल्पा अंतर्गत बनविलेली पाटचारीची तोडफोड केली. त्यामुळे कास्तकारांना नहराचे पाणी ऊन्हाळी पीकाला मिळणे बंद होऊन कास्तकारांचे लाखो रुपयांचे नुकसान होत असल्याबाबतची माहिती शिवसेना तालुका प्रमुख प्रकाश लसुंते यांना लक्षात आणून दिली असता लसूंते यांनी सहाय्यक अभियंता शाखा बघेडा यांचेकडे जाऊन तक्रार केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : तुमसर मोहाडी तालुक्यातील शेतकऱ्यांना वरदान ठरलेल्या आंतरराज्यीय बावनथडी राजीवसागर प्रकल्पांतर्गत तालुक्यातील गर्रा बघेडा येथे बनविलेली पाटचारी (छोटा कालवा) काही अज्ञात इसमाने फोडली. परिणामी शेतकऱ्यांना शेतीसाठी कालव्याचे पाणी मिळत नसल्याने उन्हाळी पीक मरणासन्न अवस्थेत पोहचले आहेत. परिणामी शेतकऱ्यांना लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
तालुक्यातील गर्रा येथील काही अज्ञात लोकांनी स्वार्थ साधण्यासाठी बावनथडी प्रकल्पा अंतर्गत बनविलेली पाटचारीची तोडफोड केली. त्यामुळे कास्तकारांना नहराचे पाणी ऊन्हाळी पीकाला मिळणे बंद होऊन कास्तकारांचे लाखो रुपयांचे नुकसान होत असल्याबाबतची माहिती शिवसेना तालुका प्रमुख प्रकाश लसुंते यांना लक्षात आणून दिली असता लसूंते यांनी सहाय्यक अभियंता शाखा बघेडा यांचेकडे जाऊन तक्रार केली. संबधित अधिकारी यांना प्रत्यक्ष घटनास्थळी घेऊन जाऊन घटनेचे गांभीर्य विचारात घेता शेतकऱ्यांच्या समस्या तात्काळ सोडवून नुकसान भरपाईची मागणी केली.
यावेळी उपजिल्हा प्रमुख नरेश उचिबघले, अशोक ठाकूर माजी उपसरपंच, पाणीपुरवठा समिती सचिव फकीरचंद राऊत, माजी सरपंच वसंत तरटे, सचिन गनोवकर, सुनील उचीबगले लीला गनोवकर, सुरज राहांगडाले, मधुकर तरटे, झाळू जैतवार, दुर्गाबाई बोबडे, अंताराम मालाधरे व शेतकरी उपस्थित होते.