महसूल प्रशासन जनतेसोबत असल्याची ओळख कामामार्फत दाखवा

By admin | Published: August 2, 2015 12:50 AM2015-08-02T00:50:20+5:302015-08-02T00:50:20+5:30

महसूल हा शासनाचा अतिशय महत्वाचा विभाग आहे. लोकांना जोडण्याचे आणि लोकांच्या सुखदुख:त सहभागी होण्याची संधी या विभागाने ...

Demonstrate revenue administration is with the public | महसूल प्रशासन जनतेसोबत असल्याची ओळख कामामार्फत दाखवा

महसूल प्रशासन जनतेसोबत असल्याची ओळख कामामार्फत दाखवा

Next

महसूल दिन : जिल्हाधिकारी धीरजकुमार यांचे आवाहन
भंडारा : महसूल हा शासनाचा अतिशय महत्वाचा विभाग आहे. लोकांना जोडण्याचे आणि लोकांच्या सुखदुख:त सहभागी होण्याची संधी या विभागाने आपल्याला उपलब्ध करुन दिली आहे. या संधीचा योग्य वापर करुन जनतेची कामे तत्परतेने करा आणि महसूल विभाग लोकांच्या सोबत आहे असा संदेश आपल्या कामामार्फत लोकांपर्यंत पोहचवा, असे आवाहन जिल्हाधिकारी धीरज कुमार यांनी केले.
१ आॅगष्ट हा महसूल दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या निमित्त सामाजिक न्याय भवनात आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी माजी राष्ट्रपती ए.पी.जे अब्दुल कलाम यांना श्रध्दांजली अर्पित करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या प्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी प्रविण महाजन, उपजिल्हाधिकारी विजया बनकर, सुजाता गंधे, विजय उरकुडे, जी. जी. जोशी, श्री. गवळी, पुरवठा अधिकारी अनिल बनसोड उपविभागीय अधिकारी डॉ. संपत खिलारी, तहसिलदार सुशांत बनसोडे, यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
पुढे बोलतांना जिल्हाधिकारी म्हणाले, मागील वर्षी आपण काय केले, यावषीर्चे आपले उद्दिष्ट काय आहे, त्यापर्यंत पोहचण्यासाठी आपण काय करणार आहोत, याचे नियोजन करण्याचा हा दिवस आहे. माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे मिशन २०२० हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण प्रामाणिकपणे काम केले पाहिजे. प्रत्येकाची भूमिका महत्वाची आहे. शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी एका क्षणात सामान्य माणसामध्ये आत्मविश्वास निर्माण करु शकतात. त्याला जगण्याचा आनंद मिळवून देवू शकतात. एक विकसित राष्ट्र होण्यासाठी तळागाळातील माणसाची प्रगती होणे आवश्यक आहे. आपल्या विभागाचे काम अतिशय महत्वाचे असून महसूल विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी लोकांसोबत आहेत हा संदेश आपल्या कामातून त्यांच्यापर्यंत गेला पाहिजे. लोकांना भेटून त्यांच्या तक्रारी समजून घेवून त्या सोडवल्या पाहिजेत, असेही ते म्हणाले. आपल्या विभागाची नाळ ही जमिनीशी, मातीशी जोडली गेली आहे. ही नाळ तुटू नये म्हणून सामान्य माणसाची कामे तत्परतेने करायला हवी. लोकांच्या तक्रारी वाढल्यामुळे शासनाला लोकसेवा हमी कायदा आणावा लागला. आता विहित कालावधीत लोकांची कामे केली नाही तर त्यासाठी आपल्याला दंड लागू शकतो, असेही जिल्हाधिकारी यांनी सांगिततले.
यावेळी लाभार्थ्यांना राष्ट्रीय कुटुंब लाभ अर्थ सहाय्य आणि वर्ग-२ च्या जमिनीचे वर्ग-१ मध्ये रुपांतरण दाखले वाटप करण्यात आले. तसेच भंडारा उपविभागातील भंडारा व पवनी येथील गावांचे लोकसहभागातून तयार करण्यात आलेले नकाशे तलाठयांना हस्तांतरीत करण्यात आले. त्याचबरोबर उपजिल्हाधिकारी सुजाता गंधे यांनी महाराजस्व अभियान, निवासी उपजिल्हाधिकारी प्रविण महाजन यांनी महाराष्ट्र लोकसेवा हमी कायदा आणि अप्पर कोषागार अधिकारी अर्चना कसबेकर यांनी शासकीय जमा लेखांकन पध्दती (गव्हंर्मेंट रिसिंप्ट आॅकांऊटींग सिस्टीम ) याबाबत पावर पाइंट प्रेझेंटेशनद्वारे माहिती दिली. दरम्यान महसूल दिनानिमित्त सकाळी तहसिल कार्यालयात रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी धीरज कुमार आणि उपविभागीय अधिकारी डॉ. संपत खिलारी, तहसिलदार सुशांत बनसोडे, नायब तहसिलदार नावनाथ कातकडे यांनी तसेच इतर ५० अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले. तसेच जिल्हाधिकारी कार्यालय आणि रॉयल पब्लीक स्कुल येथे वृक्षारोपण करुन हा दिवस साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. संपत खिलारी यांनी केले. संचालन तहसिलदार सुशांत बनसोडे तर आभार पवनी तहसिलदार पाटील यांनी व्यक्त केले. यावेळी महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच लाभार्थी उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Demonstrate revenue administration is with the public

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.