कृषिकन्येद्वारे धान बीजाचे प्रात्यक्षिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2021 04:13 AM2021-08-02T04:13:18+5:302021-08-02T04:13:18+5:30

भंडारा जिल्हा हा धान पिकासाठी प्रसिद्ध आहे, मात्र धानाचे बीज शेतात टाकताना कोणती काळजी घ्यावी जेणेकरून भरघोस उत्पादन घेता ...

Demonstration of paddy seeds by a farmer | कृषिकन्येद्वारे धान बीजाचे प्रात्यक्षिक

कृषिकन्येद्वारे धान बीजाचे प्रात्यक्षिक

googlenewsNext

भंडारा जिल्हा हा धान पिकासाठी प्रसिद्ध आहे, मात्र धानाचे बीज शेतात टाकताना कोणती काळजी घ्यावी जेणेकरून भरघोस उत्पादन घेता येईल, याचे ज्ञान सर्वसामान्य शेतकऱ्यांना नसल्याने अनेकदा बीज उगवत नाही व नुकसान होतो. यासाठी कृषिकन्या पौर्णिमा बिसेन हिने बीजावर प्रक्रिया कशी करावी याचे प्रात्यक्षिक करून दाखविले. प्रक्रिया केलेले बीज संपूर्ण उगवतातच पण येणाऱ्या रोगापासूनही यामुळे संरक्षण होते. याप्रसंगी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सी. यु. पाटील, उपप्राचार्य एस. के. चिंताले, प्रा. वाय. एस. वाकोडे, ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम अधिकारी प्रा. सपकाळ, यांच्या मार्गदर्शनात हा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाला तुलसीदास चौधरी, सुभाष बिसेन, गिरधर खंडरे, श्रीधर खंडरे, जयेंद्र टेंभरे, अरविंद आंबाडारे, विजय आंबाडारे, पोलीस पाटील मुन्नीलाल बिसेन आदी शेतकरी उपस्थित होते.

Web Title: Demonstration of paddy seeds by a farmer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.