धनेगावात शून्य ऊर्जा शीत कक्षाचे प्रात्यक्षिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:40 AM2021-09-12T04:40:21+5:302021-09-12T04:40:21+5:30
यावेळी झामदेव वाहने, नितीन मसराम, अविनाश वाहने, रमेश मसराम, ममता वाहने, पुष्पा वाहने, भागवत मसराम उपस्थित होते. शून्य ऊर्जा ...
यावेळी झामदेव वाहने, नितीन मसराम, अविनाश वाहने, रमेश मसराम, ममता वाहने, पुष्पा वाहने, भागवत मसराम उपस्थित होते. शून्य ऊर्जा शीत कक्षाची निर्मिती शेतकऱ्यांना लाभदायक असून त्यांचे फळे, भाज्या व अन्य वस्तू ताजे ठेवण्यासाठी मदतीचे ठरत आहे. ग्रामीण भागात इलेक्ट्रॉनिक उपकरणावर आधारित अन्य उपकरणाची सोय शेतकऱ्यांना अवघडच आहे. शेतकरी शेती व्यवसायातून आर्थिक नफा कमावण्यासाठी भाजीपाल्याचे उत्पादन घेत आहे; परंतु भाजीपाला उत्पादन अधिक काळ टिकत राहत नसल्याने त्यांना नुकसान सोसावे लागत आहे. शेतकऱ्यांनी शून्य ऊर्जा शीत कक्षाची निर्मिती केल्यास भाजीपाला टिकविण्यासाठी मदतीचे ठरणार असल्याची माहिती कल्याणी उके हिने दिली. त्यांनी यावेळी शीत कक्षाच्या निर्मितीकरिता लागणारे साहित्य तथा प्रात्यक्षिक करून दाखविले. प्राचार्य नागरगोजे, कार्यक्रम अधिकारी प्रा. खुराणा, डॉ. लाजूरकर, प्रा. महेंद्र लोंढे, प्रा. गव्हाणे, प्रा. वावधने, प्रा. वाहेकर, प्रा. वासनिक यांचे मार्गदर्शनात माहिती देण्यात आली आहे. यावेळी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.