पत्रकार संरक्षण कायद्यासाठी निदर्शने

By Admin | Published: October 3, 2016 12:35 AM2016-10-03T00:35:09+5:302016-10-03T00:35:09+5:30

पत्रकार संरक्षण कायदा झाला पाहिजे या मागणीसाठी आज राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये धरणे व निदर्शने करण्यात आले.

Demonstrations for the press protection law | पत्रकार संरक्षण कायद्यासाठी निदर्शने

पत्रकार संरक्षण कायद्यासाठी निदर्शने

googlenewsNext

भंडारा : पत्रकार संरक्षण कायदा झाला पाहिजे या मागणीसाठी आज राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये धरणे व निदर्शने करण्यात आले. भंडारा जिल्ह्यात सुध्दा पत्रकार संरक्षण कायदा झाला पाहिजे या मागणीसाठी धरणे व निदर्शने करण्यात आले. भंडारा जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे व निदर्शने करण्यात आली. 
अ. भा. मराठी पत्रकार संघ मुंबई संलग्नित भंडारा जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे निदर्शने करण्यात आली. संघाचे अध्यक्ष चेतन भैरम यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली. सभेत जेष्ठ पत्रकार डी.एफ. कोचे, शशीकुमार वर्मा, नंदू परसावार, हिवराज उके, प्रा. बबन मेश्राम यांनी राज्यात व देशात दिवसेंदिवस पत्रकारावर होणारे हल्ले निंदणीय असून पत्रकाराच्या संरक्षणासाठी पत्रकार संरक्षण कायदा झालाच पाहिजे, अशी एकमुखी मागणी करण्यात आली. सचिव मिलिंद हळवे यांनी संरक्षण कायद्यासाठी पत्रकार तिव्र निदर्शने व आंदोलन करतील असा इशारा दिला. त्यानंतर पत्रकारांनी पत्रकार भवनासमोर धरणे देऊन निदर्शने देण्यात आली. संचालन चंद्रकांत श्रीकोंडवार यांनी तर प्रास्ताविक राकेश चेटुले यांनी केले. आभार प्रा. बबन मेश्राम यांनी मानले. यावेळी काशिनाथ ढोमणे, सुरेश कोटगले, विजय क्षिरसागर, संघर्ष शेंडे, ललितकुमार बाच्छिल, जयकृष्ण बावनकुळे, विलास सुदामे, चंद्रकांत शहारे, तथागत मेश्राम, अभिजीत घोडमारे, प्रा. शैलेश कोसनखेडे उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Demonstrations for the press protection law

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.