१४७ मतदान केंद्रांवर होणार मतदानाचे प्रात्यक्षिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2018 10:34 PM2018-12-31T22:34:56+5:302018-12-31T22:35:19+5:30
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. त्या पूर्वतयारीचा भाग म्हणून मोहाडी तालुक्यातील १४७ मतदान केंद्रावर इव्हीएम मशिनवर मतदानाचे प्रात्याक्षिक केले जाणार असल्याची माहिती तहसीलदार नवनाथ कातकडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
मोहाडी : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. त्या पूर्वतयारीचा भाग म्हणून मोहाडी तालुक्यातील १४७ मतदान केंद्रावर इव्हीएम मशिनवर मतदानाचे प्रात्याक्षिक केले जाणार असल्याची माहिती तहसीलदार नवनाथ कातकडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग यांच्या निर्देशानुसार लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू करण्यात आली आहे. महसूल प्रशासन कामाला लागली आहे. मतदारांमध्ये व्यापक जागृती करण्यासाठी तालुका प्रशासनाने नियोजन केले आहे. मोहाडी तालुक्यातील १४७ मतदान केंद्रावर इव्हीएम व व्हीव्हीपीएटी मशिनवर मतदार प्रात्यक्षिक १ जानेवारी पासून करणार आहेत. २२ जानेवारीपर्यंत मतदानाचे प्रात्यक्षिक कार्यक्रम होणार आहे.
२२ दिवसात एकूण १०२ प्रात्यक्षिक करण्यात येणार असल्याची माहिती तहसिलदार नवनाथ कातकडे यांनी दिली. इव्हीएम व व्हीव्हीपॅड बाबत जनजागृती गावातील मुख्य चौक नाका, बाजार, शासकीय कार्यालय, ग्रामपंचायत कार्यालय, सभांची ठिकाणी मतदानाचे प्रात्यक्षिक करून शेवटी मतदानाची मतमोजणी सर्वासमक्ष केली जाणार आहे. मतदान कार्यक्रमाबाबत सर्व राजकीय पक्षांना कळविण्यात आले आहे.
राजकीय पक्षांनी या जागृती कार्यक्रमात सहकार्य करण्याचे आवाहन तहसीलदार नवनाथ कातकडे यांनी केले आहे. जनजागृती दरम्यान मतदान करणाऱ्यांचे नाव रेकार्ड करण्यात येईल. तसेच काही समस्या उद्भवतात काय याची माहिती घेवून त्रूाचे निराकरणही केले जाणार आहे. जिल्हा प्रशासनाकडून मतदान जनजागृती कार्यक्रमासाठी मोबाईल व्हॅन प्राप्त झाली आहे.
तसेच मतदान यंत्रे ठेवण्यासाठी तहसिल कार्यालयाच्या निवडणूक विभागात स्ट्राँग रूमची व्यवस्था केली आहे. ईव्हीएम, व्हीव्हीपॅडच्या जनजागृतीची सुरूवात कांद्री, हिवरा, बच्छेरा, वासेरा येथून १ जानेवारीपासून व शेवट २२ जानेवारी रोजी जांभोरा, पालोरा, केसलवाडा, बोरगाव, किसनपूर येथे करण्यात येणार आहे. या जनजागृतीसाठी ३४ कर्मचाºयांचे सहा पथक तयार करण्यात आले आहेत. यात विविध विभागाचे कर्मचारी सहभागी होणार आहेत.