निकृष्ट सांगून धान खरेदीस नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2017 11:27 PM2017-11-08T23:27:48+5:302017-11-08T23:28:12+5:30

कन्हाळगाव येथील शामसुंदर खुणे या शेतकºयाने शेतात उत्पादीत केलेले धानपीक निकृष्ट दर्जाचे असल्याचे दर्शवून त्यांचे धान खरेदी करण्यास नकार देत चक्क परत करण्यात आले.

Denying Paddy Purchase By Declaring | निकृष्ट सांगून धान खरेदीस नकार

निकृष्ट सांगून धान खरेदीस नकार

Next
ठळक मुद्देवडेगाव केंद्रावरील प्रकार : शेतकरी हतबल, संबंधितांवर कारवाईची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
अर्जुनी-मोरगाव : कन्हाळगाव येथील शामसुंदर खुणे या शेतकºयाने शेतात उत्पादीत केलेले धानपीक निकृष्ट दर्जाचे असल्याचे दर्शवून त्यांचे धान खरेदी करण्यास नकार देत चक्क परत करण्यात आले. हा प्रकार येथील खरेदी-विक्री समितीच्या वडेगाव-रेल्वे येथील धान खरेदी केद्रावर घडला. या प्रकारामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.
प्राप्त माहितीनुसार, वडेगाव-रेल्वे येथे वडेगाव, कन्हाळगाव व घाटी पळसगाव येथील शेतकºयांचे धान खरेदी करण्यासाठी शासकीय हमीभाव धान खरेदी केंद्र सुरू आहे. शेतकºयांनी शासकीय धान खरेदी केंद्रावरच धान विक्री करावे. खासगी व्यापाºयांना विक्री करू नये असे शासनाचे धोरण आहे. त्यानुसार खुणे यांनी आपल्या शेतात उत्पादीत धान वडेगाव-रेल्वे येथील धान खरेदी केंद्रावर विक्रीसाठी नेले.
सोबतच बिदान या वाणाचे धान आणखी काही शेतकºयांनी नेले. इतर शेतकºयांच्या धानाची मोजणी ग्रेडरने केली. मात्र खुणे यांच्या धानाची मोजणी केली नाही. जिल्हा विपणन अधिकारी व ख.वि.समितीचे व्यवस्थापक सुरेश गंथडे यांनी धान निकृष्ट दर्जाचे आहे, इतरत्र विक्रीची व्यवस्था करा असे खुणे यांना सांगीतले.
शेतकºयांची यावर्षी परिस्थिती अत्यंत खराब आहे. अल्पवृष्टी, कीड व वादळाने धान नेस्तनाबूत केले. त्यामुळे धानाचा दर्जा खालावलेला आहे. अस्मानी संकटाने शेतकºयांना दगा दिला. मात्र आता हा धान विक्री होत नसल्याने बळीराजासमोर मोठे सुलतानी संकट उद्भवले आहे. युती सरकार शेतकºयांच्या पाठीशी असल्याचे म्हटले जाते. मात्र शासकीय धान खरेदी केंद्राकडून धान खरेदी केली जात नाही. शेतकºयांनी आपली कैफीयत मांडायची कुणाकडे हा गंभीर प्रश्न आहे. याच धान खरेदी केंद्रावर काही शेतकºयांचे यापेक्षा निकृष्ट दर्जाचे धान खरेदी करण्यात आले. खरेदीत दुजाभाव केला जात असल्याचा खुणे यांचा आरोप आहे.
आधीच जर्जर झालेल्या शेतकºयांनी स्वत:चे पैसे खर्च करून घरापासून अथवा शेतापासून तर धान खरेदी केंद्रापर्यंत वाहतुकीचा खर्च करायचा. नंतर ग्रेडरच्या सांगण्यावरून पैसे खर्च करून पुन्हा घरी परत घेऊन जायचे अथवा नाईलाजास्तव अल्पदरात व्यापाºयाला विकायचे या प्रकारामुळे खुणे यांना मनस्ताप झाला असून त्यांचा यंत्रणेवरील विश्वास उडाला आहे.
धान खरेदी करणाºया संस्थाच शेतकºयांना व्यापाºयाला धान विकण्यासाठी बाध्य करतात असा आरोप खुणे यांनी केला आहे. शासनाच्या प्रतिनिधींनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून संबंधीतांवर कारवाई करावी व शासन शेतकºयांच्या पाठीशी असल्याचे सिद्ध करून दाखवावे अशी मागणीही त्यांनी केली आहे.

ग्रेडरची नियमबाह्य नियुक्ती
धान खरेदी केंद्रांवर मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील गे्रडरची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या परिसरात उस, कापूस, कांदा, मका व द्राक्षांची लागवड होते. त्यांना धानाचे वाण काय समजणार असा सवाल खुणे यांनी केला आहे. धान खरेदी केंद्रांवर धान उत्पादक परिसरातीलच ग्रेडरची नियुक्ती करण्याची मागणी त्यांनी केली आहे. यासंदर्भात व्यवस्थापक गंथडे यांच्याशी चर्चा केली असता, ग्रेडर कोणत्या परिसरातील आहेत याची आपणास माहिती नसल्याचे सांगीतले. खुणे यांचे धान निकृष्ट दर्जाचे असल्याने अचानक दौºयावर असलेल्या जिल्हा विपणन अधिकाºयांनी खरेदी करण्यास नकार दिल्याचे त्यांनी सांगीतले.

Web Title: Denying Paddy Purchase By Declaring

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.