भंडारातील १८४ मजुरांची लखनऊला रवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2020 05:00 AM2020-05-04T05:00:00+5:302020-05-04T05:00:57+5:30

लॉकडाऊन घोषित झाल्यानंतर देशभरातील विविध भागात असंख्य स्थलांतरीत मजदूर ठिकठिकाणी अडकलेले आहेत. स्वगावी परत जाण्यासाठी या मजूरांनी पायदळ जाण्याचा मार्गही स्विकारला आहे. अनेक ठिकाणी हे दृश्य बघायला मिळत आहे. असाच प्रकार भंडारा शहरातही दिसून आला. केंद्र शासनाने लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या सर्व स्थलांतरीत मजूरांना त्यांच्या मुळगावी पाठविण्यासाठी सवलत दिली आहे.

Departure of 184 workers from Bhandara to Lucknow | भंडारातील १८४ मजुरांची लखनऊला रवानगी

भंडारातील १८४ मजुरांची लखनऊला रवानगी

Next
ठळक मुद्देजिल्हा प्रशासनाचा पुढाकार : पहिली तुकडी एसटी बसने पोहचली नागपूरला

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : येथे अडकलेल्या मजुरांपैकी १८४ स्थलांतरीत मजुरांची पहिली तुकडी एसटीने नागपूरला रवाना करण्यात आली. तेथून रेल्वेने मजूरांना लखनऊ येथे पाठविण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासनातर्फे केंद्र सरकारने घालून दिलेल्या निर्देशानुसार ही प्रक्रिया रविवारी भंडारा शहरात राबविण्यात आली.
लॉकडाऊन घोषित झाल्यानंतर देशभरातील विविध भागात असंख्य स्थलांतरीत मजदूर ठिकठिकाणी अडकलेले आहेत. स्वगावी परत जाण्यासाठी या मजूरांनी पायदळ जाण्याचा मार्गही स्विकारला आहे. अनेक ठिकाणी हे दृश्य बघायला मिळत आहे. असाच प्रकार भंडारा शहरातही दिसून आला. केंद्र शासनाने लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या सर्व स्थलांतरीत मजूरांना त्यांच्या मुळगावी पाठविण्यासाठी सवलत दिली आहे.
त्यानुसार जिल्हा प्रशासनामार्फत सदर मजूरांना लखनऊ येथे पाठविण्यासाठी प्रक्रिया राबविण्यात आली.
खासदार सुनील मेंढे यांनी बसस्थानकावर जाऊन याबाबत प्रत्यक्ष पाहणी केली. प्रशासनाच्या दिशानिर्देशानुसार मजुरांना मूळ ठिकाणी जाण्यासाठी संपूर्ण प्रक्रियेचे पालन करावे, अफवांवर विश्वास ठेवू नये, असे मतही खासदार मेंढे यांनी व्यक्त केले. याप्रसंगी सोशल डिस्टन्सिंगचे पूर्णपणे पालन करण्यात आले. १८४ मजूरांची वैद्यकीय तपासणी करुन यादीनिहाय त्यांची एसटीने नागपूर रेल्वे स्थानकावर सोडण्यात आले.

स्वगावी जाण्यासाठी धडपड
लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या या मजूरांना आपल्या मुळगावी जाण्यासाठी धडपड करावी लागत आहे. पहिली तुकडी रवाना झाल्यानंतर उर्वरित असलेल्या मजुरांनाही त्यांचा नंबर केव्हा लागेल याची प्रतीक्षा आहे. जिल्हा प्रशासनाने त्यांचीही अशीच सोय केली आहे, असेही कळविण्यात आले आहे.

Web Title: Departure of 184 workers from Bhandara to Lucknow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.