ग्रामीण भागात लसीकरणाची उदासीनता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:37 AM2021-05-08T04:37:18+5:302021-05-08T04:37:18+5:30
चुल्हाड ( सिहोरा ) : शरीरात रोग प्रतिकारशक्ती तयार करण्यासाठी शासनाच्या आरोग्य विभागाने लसीकरण मोहीम सुरू केली आहे. लसीकरण ...
चुल्हाड ( सिहोरा ) : शरीरात रोग प्रतिकारशक्ती तयार करण्यासाठी शासनाच्या आरोग्य विभागाने लसीकरण मोहीम सुरू केली आहे. लसीकरण केंद्रावरील गर्दी टाळण्यासाठी गावांत शिबिर आयोजित करण्यात येत आहेत. परंतु नागरिकांचा प्रतिसाद दिसून येत नाही. असे असले तरी गोंडीटोला गावात ८३ नागरिकांनी लसीकरण केले आहे. अन्य गावातील नागरिकांना प्रेरणादायी ठरत आहेत.
कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असताना शासनाने लसीकरण मोहिमेला वेग दिला आहे. लसीकरण केंद्रावरील गर्दी टाळण्यासाठी टप्प्यात लसीकरण केले जात आहेत. शहरात लसीकरण करण्यासाठी नागरिकांच्या रांगा लागल्या असताना ग्रामीण भागात मात्र आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना लसीकरणासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. सिहोरा परिसरातील गावात लसीकरण मोहिमेची सुरुवात करण्यात आली आहे. गावात आरोग्य विभागाची यंत्रणा दाखल होत आहे. लसीकरण संदर्भात जनजागृती करण्यात येत आहे. परंतु दिवसभर या केंद्राकडे लसीकरणासाठी कुणी भटकत नाहीत. अनेकांनी पहिला लसीकरणाचे डोस घेतले आहे. दुसऱ्या डोस करिता उदासीनता दाखविली आहे. आशा सेविका घराघरात माहिती देत असले तरी त्यांना खडेबोल सुनावले जात आहेत. बहुतांश नागरिकांत लसीकरण संदर्भात भ्रम निर्माण झाले आहे.
अफवांना बळी पडल्याने लसीकरण संदर्भात सकारात्मक परिणाम दिसून आले नाहीत. लसीकरण मोहीम गावात राबविण्यासाठी गावात समिती स्थापन करण्यात आली आहे. सरपंच ते तलाठीपर्यंत लोकप्रतिनिधी, कर्मचारी यांचा समावेश करण्यात आला आहे. परंतु ग्रामपंचायतमध्ये लसीकरण मोहीम सुरु असताना समितीचे सदस्य उपस्थित राहत नाहीत. दरम्यान गोंडीटोला गाव या सर्व प्रकाराला अपवाद ठरला आहे. या गावात ४५ पेक्षा अधिक वयोगटातील नागरिकांची नोंद करण्यात आली आहे. लसीकरणासाठी नागरिकांनी उत्तम प्रतिसाद देण्यास सुरुवात केली आहे. दोन टप्प्याचे लसीकरण शिबिर गावात राबविण्यात आले आहे. यात ८३ नागरिकांनी लसीकरण केले आहे.
बॉक्स
केंद्रावर ब्लड प्रेशर, डायबिटीज तपासणी करा
केंद्रावर लसीकरण करताना नागरिकांची अन्य आजाराविषयी तपासणी करण्यात येत नाहीत. ब्लड प्रेशर, डायबिटीज तपासणी केली पाहिजे, हाय ब्लड प्रेशर असणारे नागरिक लसीकरणासाठी येताच डोक्यात चुकीचा भ्रम असल्याने ब्लड प्रेशर वाढत आहे. घामाघूम झाले असता. त्यांना घरी परत पाठविले जात आहे. डोक्यातील भ्रम काढण्यासाठी त्यांचे प्राथमिक स्तरावरील तपासण्या करण्याची गरज आहे. गावात जुन्या पिढीतील नागरिक अशिक्षित आहेत. बॉक्स
ऑक्सिजन प्लांट करिता चुल्हाडच्या तरुणांचा पुढाकार
ऑक्सिजनच्या समस्याने अनेकांनी जगाचा निरोप घेतला आहे. समाजाला काही देने आहे, असे गृहीत धरून चुल्हाड येथील तरुणांनी ऑक्सिजन प्लांट निर्मिती करीता पुढाकार घेतला आहे. त्यांनी लोकवर्गणी गोळा करण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. या प्लांट मधील ऑक्सिजनचे सिलिंडर परिसरातील आरोग्य विभागाला निशुल्क पुरवठा करण्याचा मानस लोकमत जवळ व्यक्त केला आहे. या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते गुड्डू शामकुवर म्हणाले, गरीब रुग्ण ऑक्सिजनसाठी धावाधाव करीत आहेत. उपचार करण्यासाठी आर्थिक स्थिती मजबूत नसल्याने अनेकांनी जगाचा निरोप घेतला आहे. त्यांना मदतीचा हात देण्यासाठी तरुणांनी लोकवर्गणीतून ऑक्सिजन प्लांट सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.