वंचित बहुजन आघाडीची सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:31 AM2021-03-22T04:31:52+5:302021-03-22T04:31:52+5:30
भंडारा : वंचित बहुजन आघाडीच्यावतीने भंडारा जिल्ह्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने भंडारा विश्रामगृह येथे बैठक घेण्यात आली. ...
भंडारा : वंचित बहुजन आघाडीच्यावतीने भंडारा जिल्ह्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने भंडारा विश्रामगृह येथे बैठक घेण्यात आली.
यावेळी निवडणूक निरीक्षक राजू झोडे, जिल्हाध्यक्ष सुरेश खंगार, सर्वजित बनसोडे (पुणे) आणि विदर्भ समन्वय समितीचे पदाधिकारी प्रा. रमेश पिसे, मंगलमूर्ती सोनकुसरे, प्राचार्य के. एन. नान्हे, दिगंबर रामटेके, धनपाल गडपायले, उपाध्यक्ष अरविंद गोस्वामी, लाखनी तालुकाध्यक्ष दीपक जनबंधू, डॉ. भैयालाल गजभिये, अरविंद गोस्वामी, ॲड. सुजाता वालदेकर, जगदीश रंगारी, अमित वैद्य, धनपाल गडपायले, राधेश्याम कावळे, बालक गजभिये, गणवीर, जयघोष शेंडे आदी उपस्थित होते.
यावेळी बैठकीत मार्गदर्शन करताना जिल्हाध्यक्ष सुरेश खंगार यांनी संघटनेच्या रचनेवर भर देत वंचित बहुजन आघाडी प्रमुखांना सक्रिय होण्याच्या सूचना केल्या. वंचित बहुजन आघाडीचा जनाधार आहे, हे नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी बघितले असून, हा जनाधार अजून बळकट करायचा आहे. प्रामाणिक व होतकरू कार्यकर्त्यांना संधी मिळाली पाहिजे. पक्षाकरिता सदैव तत्पर असले पाहिजे, असा सल्ला त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.
या बैठकीत वंचित बहुजन आघाडीचे निरीक्षक म्हणून आलेले राजू झोडे यांनी आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने स्थानिक कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.