घरकुल लाभार्थी योजनेपासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:36 AM2021-09-11T04:36:28+5:302021-09-11T04:36:28+5:30
२०१७ मधील संगणणीकृत केलेल्या लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ देण्यात आला. २०१६ च्या पात्र लाभार्थ्यांना वगळण्यात आले आहे. विद्यमान सरपंच, ...
२०१७ मधील संगणणीकृत केलेल्या लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ देण्यात आला. २०१६ च्या पात्र लाभार्थ्यांना वगळण्यात आले आहे. विद्यमान सरपंच, ग्रामसेवक व सदस्यांनी १६३ लाभार्थ्यांना घरकुल योजनेपासून राजकीय द्वेषभावनेतून तथा वैयक्तिक हेवेदाव्यावरून शासनाच्या योजनेपासून वंचित ठेवण्यात आले असल्याचा आरोप केला आहे.
गडेगाव येथील श्रीमंत लोकांना शासकीय घरकुल योजनेचा लाभ दिला आहे. गावात राहत नसलेल्या लोकांना घरकुल देण्यात आले आहे. बाहेर गावावरून नोकरीसाठी आलेल्या लोकांना घरकुलाचा लाभ दिलेला आहे. काही घरकुल धारकांनी घरकुल भाड्याने दिलेले आहे. गडेगाव येथील १६३ लाभार्थी घरकुलपासून वंचित आहेत. २०१६ मधील घरकुल पात्र लाभार्थ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी लोकेश चौधरी, अवेश वाढई, चंद्रशेखर शेंडे, दिगांबर फुलबांधे, जितेंद्र लेंडे, महेंद्र फटिंग, आदींनी केली आहे.
कोट
प्रधानमंत्री आवास योजना सुरू झाल्यानंतर २०१८ पासून घरकुल याद्या संगणीकृत करण्यात आल्याने २०१६ मधील राज्य सरकारच्या पात्र लाभार्थी शिल्लक राहिली. यात अनुसूचित जाती, जमाती व भटके जातींच्या लोकांची प्रकरणे निकाली काढली. इतर प्रवर्गातील १०३ लाभार्थ्यांची मागणी शिल्लक असून, त्यांना नवीन यादीत स्थान देण्यात येणार आहे व तत्काळ घरकुल मंजूर केले जाणार आहे.
अनिल हारोडे, उपसरपंच, गडेगाव.