आदर्श रेल्वे स्थानकांसाठी कटिबद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2016 12:18 AM2016-06-26T00:18:30+5:302016-06-26T00:18:30+5:30

आर्थिक वर्ष २०१६-१७ मध्ये एक कोटी रूपयांचा निधी भंडारा रोड रेल्वे स्थानकाच्या विकासासाठी मंजूर झाला आहे.

Designed for ideal railway stations | आदर्श रेल्वे स्थानकांसाठी कटिबद्ध

आदर्श रेल्वे स्थानकांसाठी कटिबद्ध

Next

नाना पटोले : वरठी स्थानकावर सौंदर्यीकरण कामांचे लोकार्पण
वरठी : आर्थिक वर्ष २०१६-१७ मध्ये एक कोटी रूपयांचा निधी भंडारा रोड रेल्वे स्थानकाच्या विकासासाठी मंजूर झाला आहे. यात प्रवाशांच्या सुविधावर भर देण्यात आला आहे. भंडारा रोड रेल्वे स्टेशन हे अ दर्जाचे आदर्श रेल्वे स्थानक निर्माण कार्यास सुरूवात झाली आहे. भंडारा रेल्वेस्थानक आदर्श करण्यासाठी कटीबद्ध आहे, अशी ग्वाही खासदार नाना पटोले यांनी दिली.
भंडारा रोड रेल्वे स्थानकावर दोन प्रवासी शेडचे व विविध भागातील सौदर्यीकरणाचे काम करण्यात आले. सदर कामाचे लोकार्पण खासदार नाना पटोले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार रामचंद्र अवसरे डी.आर.एम. अमीत कुमार अग्रवाल, वाणिज्य व्यवस्थापक अर्जुन सिब्बल, सचिन शर्मा, रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य सेवक कारेमोरे, प्रा.विद्या मेश्राम, सरपंच संजय मिरासे, उपसरपंच मिलिंद रामटेके, अजय बत्रा, नीलम हलमारे, सदस्य रमेशचंद्र धोटे, रामविलास सारडा, रमेश सुपारे, वाय.एच. राठोड, वि.वि. सुब्बाराव, राहुल हांडे उपस्थित होते.
भंडारा रोड रेल्वे स्थानकाला ‘अ’ श्रेणीचा दर्जा मिळाला आहे. मागील दोन वर्षात या रेल्वे स्स्थानकावर ८५ लाख रूपयाचे काम पूर्ण करण्यात आले. यात रेल्वे प्लॉट क्रमांक १ व २ वर १०-२० लक्ष रूपये खर्च करून प्रवासी शेड तयार करण्यात आले. डिजिटल वेळापत्रक लावण्यात आले आहे. प्रवाशाकरीता प्लेटफार्म क्रमांक १ व २ वर शौचालय नुतनीकरण करून द्वितीय श्रेणी प्रतिक्षा कक्षात नवीन सुविधा उपलब्ध करून देण्यात आले.
सुरक्षेच्या साधनात वाढ करण्यात आली असून रेल्वे स्थानक परिसरात १० नवीन सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. त्याबरोबर रेल्वे स्थानक विद्युत व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आल्याचे सांगितले. कार्यक्राचे संचालन स्टेशन मास्टर कल्याण रामटेके यांनी केले. या कार्यक्रमात मिलिंद धारगावे, सुरजभान चव्हाण, माजी उपसरपंच मनोज सुखानी, देवेंद्र गावंडे, शिवा गायधने, सूर्यकांत ईलमे, आकाश काकडे, देवीदास डोंगरे, रमेश डेकाटे उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Designed for ideal railway stations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.